ताज्या घडामोडी

आदर्शमाता प्रतिष्ठान च्या वतीने मुस्लिम बांधवांचा सत्कार

Spread the love

पाडळी (केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या वतीने मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद निमित्त भव्य सत्कार करण्यात आला. कराड तालुक्यातील पालिकेस येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलाद या सणाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून हा सण साजरा करण्यात आल्याबद्दल आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने याची दखल घेऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलाद चे औचित्य साधून विविध गोर गरीब गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. तर युवकांनी या सणाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचा अनोखा उपक्रम राबवला.याची दखल सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आदर्श माता प्रतिष्ठानने घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वास मोहिते, संपतराव मोहिते, आनंदराव बडेकर यांचेसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी रईस सुलतान परवेज मुजावर, साजिद मुजावर,अझर शिकलगार, तइम्तियाज कागदी यांच्या सह पाडळी (केसे) गावच्या असंख्य मुस्लिम बांधवांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!