आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

श्री डोळसनाथ नागरी पतसंस्थेचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यवसायात आपलं ज्ञान अद्ययावत असल्याशिवाय आपण यश गाठू शकत नाही..

Spread the love

श्री डोळसनाथ नागरी पतसंस्थेचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यवसायात आपलं ज्ञान अद्ययावत असल्याशिवाय आपण यश गाठू शकत नाही!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १४ फेब्रुवारी.

या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यवसायात आपलं ज्ञान अद्ययावत असल्याशिवाय आपण यश गाठू शकत नाही. हे लक्षात घेऊनच- डोळसनाथ पतसंस्थेचे संस्थापक आणि मार्गदर्शक. बबनरावजी भेगडे,तसेच संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे या उभयतांच्या संकल्पनेतून महाबळेश्वरच्या हिरकणी या अत्याधुनिक रिसॉर्ट मध्ये दिनांक ११ व‌ १२ फेब्रुवारी रोजी डोळसनाथ पतसंस्थेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 

कार्यशाळेचे उद्दिष्ट असे होते की, सर्व संचालक व कर्मचारी व पिग्मी एजंट या सर्वांना नवीन येणाऱ्या कायद्याचा परिचय व्हावा, तसेच संस्थेच्या मार्केटिंग बाबत पुढील ध्येय धोरण आणि दिशा निश्चितीबाबत बँकिंग क्षेत्रातील ज्ञान- अनुभव संपन्न अशा व्याख्यात्यांचं मार्गदर्शन व्हावं हा उद्देश होता.

पुणे पीपल्स को बँकेचे मा महाव्यवस्थापक. सदानंदजी दीक्षित- अलिबाग येथील आदर्श पतसंस्थेचे डिजिटल तज्ञ चेअरमन. अभिजीत पाटील, संस्थेचे सल्लागार. डॉक्टर शालिग्राम भंडारी,  महेश भाईशहा, व्याख्याते. सुनील शेटे या सर्वांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून संस्थेचे हे उद्दिष्ट शंभर टक्के यशस्वी केले.

संस्थेचे सर्व संचालक- व्यवस्थापक- कर्मचारी आणि पिग्मी एजंट यांनीही प्रत्येक विषयातील चर्चेत मनापासून भाग घेतला. अनेक प्रश्न विचारून आपलेही समाधान करून घेतले म्हणूनच खऱ्याअर्थाने ही कार्यशाळा यशस्वी झाली. अध्यक्ष राहुल पारगे. यांनी- व्याख्याते. अभिजीत पाटील यांचे आणि व्याख्याते. सदानंद दीक्षित- सुनील शेटे या उभयतांचे उपाध्यक्ष. विकास कंद यांनी अतिशय योग्य शब्दात आभार मानले.  संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे यांच्या नेतृत्वाखाली- अभ्यासू तितक्याच संवेदनशील व्यवस्थापक.  तसलीम शिकीलकर मॅडम- अध्यक्ष. राहुल पारगे- उपाध्यक्ष निलेश राक्षे- विकास कंद- सचिव- अतुल राऊत, खजिनदार. कौस्तुभ भेगडे, माजी अध्यक्ष  शरद भोंगाडे आणि कर्मचारी  अतुल काकडे- यांनी खरोखरच विशेष परिश्रम घेतले. बँकिंग क्षेत्रातील अनुभवसंपन्न.महेशशहा- उद्योगात अग्रगणी असलेले  संजय ओसवाल आणि ज्येष्ठ साहित्यिक- वक्ते डॉक्टर शालिग्राम भंडारी. यां संस्थेच्या सल्लागारांनीही या कार्यशाळेत सक्रिय भाग घेतला.

यावेळी माजी अध्यक्ष. शरद भोंगाडे, संस्थेचे संचालक अंकुश आंबेकर, आशिष खांडगे, अनिल पवार,समीर भेगडे, विजय भेगडे, प्रविण मुऱ्हे , अरविंद गद्रे, राकेश खळदे ,अमित भसे तसेच संस्थेचे सल्लागार डॉ. शाळीग्राम भंडारी, महेशभाई शहा, चंद्रजीत वाघमारे,संजय ओसवाल, कर्मचारी वृंद व दैनंदिन बचत प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

महाबळेश्वरच अल्हाददायक प्रसन्न वातावरण! मनोरंजनातून प्रबोधन! आणि त्यातून परिवर्तन ही विलक्षण अनुभूती कार्यशाळेतील सहभागींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आणि हीच या संस्था आयोजित कार्यशाळेच्या यशस्वीतेची पावती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!