ताज्या घडामोडी

अरविंद माने यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Spread the love

एक गाव व दोन वाड्यावर ४०० कुटुंबांना केले दिपावली साहित्य वाटप 
कोकरुड/प्रतापराव शिंदे
आपण समाजाचे काही तरी देण लागतो याचे उत्तरदायित्व म्हणून आपण समाजासाठी काहीतरी करावे या उदात्त भावनेतून. महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरविंद माने यांनी आपल्या जन्मभूमीतील अमेणीपैकी तळेकरवाडी,पोटळेवाडी,सिद्धार्थ नगर,पाटील गल्ली,भणगेवाडी,येडेकरवाडी,पवारवडी,खोंगेवाडी व माणगाव पैकी कारंडेवाडी व शिरगावपैकी पावडाईवाडी येथिल सुमारे चारशे कुटुंबांना दिपावली पुर्वीच दिवाळी फराळाचे साहित्य वाटप करुन समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शिराळा, शाहूवाडी तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावे डोंगर दऱ्या खोऱ्यात वसलेली आहेत.यापैकीच शाहूवाडी पश्चिम भागातील अमेणी,कारंडेवाडी,पावडाईवाडी हि गाव आहेत.येथे अल्पभूधारक शेतकरीवर्ग असुन कुटुंबांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी प्रत्येक घरातील एक जन तरी मुंबई गाठतो. येथिल प्रामाणिक व काबाडकष्ट करून राबणारी माणसं जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. त्यांच्या प्रति एक नातं सणाचे,एक नातं मनाचे हा विधायक उपक्रम राबविण्यात आला. या परिसरातील मुलांनी शिकावं, मोठ व्हाव. युवकांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे असे आवाहन करणारे अरविंद माने गावातील धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रभागी असतात. या उपक्रमाप्रसंगी पै.युवराज पाटील,शिवाजी भणगे,सुभाष पाटील शिवाजी पाटील,मधुकर पवार,आनंदा पवार,गुंगा मोरे,अनिल मोरे,गोरख पवार,नथुराम नायकवडी,सतीश माने, सर्जेराव मोरे,पांडुरंग नायकवडी, आनंदा कदम,मा.सरपंच यशवंत कदम,बाळाराम कदम,संतोष कदम दत्ता कदम,सागर कदम(फौजी),दगडू कदम,भगवान येडेकर,जयवंत येडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!