ताज्या घडामोडी

दलित महासंघाच्यावतीने सलग चौथ्या दिवशी बेमुदत ठिय्या आंदोलन

Spread the love

नेर्ले ( ता. वाळवा ) इस्लामपूर तहसीलकार्यालया समोर दलित महासंघाच्यावतीने सलग चौथ्या दिवशी सुरु असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनात भ्रष्ट  मंडल अधिकारी आणि तलाठी यांना पाठिशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे चक्क श्राद्ध घालण्यात आले……… सविस्तर असे कि, इस्लामपूर येथे दलित महासंघाच्या वतीने इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर सुरू असणारे बेमुदत ठिय्या धरणे आंदोलन सुरु असून, या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे, सदरचे पीडित कुटुंब पाखरे यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार आहे. आज सलग चौथ्या दिवशी सुरु असलेल्या आंदोलनात दलित महासंघाच्या वतीने भ्रष्ट  मंडलाधिकारी आणि तलाठी यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालण्यात आले. याही आंदोलनाची शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर याहीपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे आणि तीव्रतेचे आंदोलन उद्यापासून आंदोलन छेडण्याचा ईशारा दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला. सदरचे वेगळ्या पद्धतीचे आंदोलन मा. तहसीलदारसो, आणि मा. प्रांतसो यांना दलित महासंघाचे आंदोलन पाहायला मिळतील. यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे, सांगली जिल्हा अध्यक्ष विकास बल्लाळ, वाळवा तालुका अध्यक्ष संतोष चांदणे, वाळवा तालुका कार्याध्यक्ष बापूराव बडेकर, वाळवा तालुका खजिनदार अजिंक्य बल्लाळ, इस्लामपूर शहर उपाध्यक्ष अमित पाटोळे, ज्येष्ठ नेते सुनील वारे, राजाभाऊ गायकवाड, जालिंदर मस्के, रामभाऊ वारे, रवींद्र ओव्हर, मदन चव्हाण, सोमनाथ आरती, मयूर माने, तसेच पीडित कुटुंब हे सर्वजण उपस्थित होते.तसेच उद्या या आंदोलनाचा पाचवा दिवस असून उद्या याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे असे सांगली जिल्हा अध्यक्ष विकास बल्लाळ यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!