आरोग्य व शिक्षण

दहावी,बारावी परीषेला सामोरे जाताना..

Spread the love

प्रत्येकाच्या आयुष्यात दहावी,बारावी परीक्षा म्हणजे जीवनातील महत्वाचे दोन टप्पे आहेत.दहावी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे जीवन सुखकर होते.नोकरी,लग्न,गुणवत्ता मापन,यासाठी उपयोगी ठरतात.मुला मुलींच्या जीवनात या दोन्ही परीक्षेला अतिशय महत्वाचे स्थान असल्याने त्यांना थोडेसे सांगावेसे वाटते….”सन २०२३च्या फेब्रुवारी आणि मार्चया दोन महिन्यात इयता दहावी व इयता बारावीची परीक्षा होत आहेत.दोन्ही परीक्षार्थीना परीक्षा हाल तिकीट देण्यात आलेली आहेत.त्यानुसार प्रत्येकाने आपले परीक्षा तिकीट काळजीपर्वक तपासून पाहवे,आपले नाव,परीक्षा नंबर,बोर्ड,शाळा काॅलेज चा नंबर,केंद्र नंबर,केंद्राचे नाव,परीक्षा सीट नंबर, आपण निवडलेले विषय वगैरे वगैरे प्रमाणे आहेत का नाहीत ते तपासून पाहवे.घरातील कैलेंडर वर ही तारखेनसार नोंद करुन ठेवावी.त्यावर विषय ,वेळ नमूद करुन घरातील इतरांना त्याबाबत सांगावे.परीक्षा तिकिट मध्ये काही समस्या आढळून आल्यास शाळा काॅलेज च्या मुख्याध्यापक वा वर्गशिक्षकाच्या ती समस्या वा चूक निदर्शनास आणून द्यावी.व त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कृती करावी.परीक्षा केंद्र आपल्या घरापासून किती दूर आहे,याचा अंदाज घेऊन परीक्षेसाठी घरातून निघून २० ते ३० मिनिटे परीक्षा केंद्रावर जाऊन आपला सीट नंबर, वर्ग कोठे आहे ते पाहवे.परीक्षेला जाताना थोडासा हलकासा नाष्टा,किंवा जेवन करुन जावे.सोबत पैड,कंपोस,दोन तीन चांगल्या स्थितीतील पेन ,रुमाल, परीक्षा तिकीट घेऊन जावे.प्रश्नपत्रिका मिळताच एकदा,दोनदा शांतपणे वाचून काढावी.प्रश्नपत्रिका प्रश्न व वेळ यांचा अंदाजाने मधील बसवावा.उत्तर पत्रीका अगोदर मिळाल्यास प्रथम उत्तर पत्रीकेतील सीट नंबर, सह इतर माहिती अचूकपणे भरावी.प्रश्नपत्रिका मधील सोपे लघु उत्तरे माहित असलेले खात्रीचे प्रश्न सोडवावेत,त्यानंतर सोपे वाटणारे दीर्घ प्रश्न सोडवावेत,पण दीर्घ प्रश्न लिहीताना अजूनही बाकी प्रश्न सोडवायचे आहेत ही जाणीव ठेवावी.पुरवणीची आवश्यकता वाटल्यास जरुर घ्यावी,त्यावरही सीट नंबर सह इतर माहिती अचूक भरावी,पर्यवेक्षकांची स्वाक्षरी घ्यावी.न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे आठवून लिहावीत.मनात कोणत्याही प्रकारे ताण तणाव ठेऊ नये.परीक्षा केंद्रावर पोलीस,शिक्षक व इतर कर्मचारी असतात.पेपर लिहीताना तहान लागली तर वर्गातील पर्यवेक्षकांना विचारुन पाणी पिऊन यावे,म्हणजे पेपर लिहीताना घसा कोरडा होऊन लक्ष्यविचलीत होणार नाही.पाण्याचा हात उत्तर पत्रीकेला लावण्या आधी रुमालाने हात व तोंड पुसावे.शेवटी घंटा वाजल्यानंतर सर्वांनी उत्तर पत्रीका जमा करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!