आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

सुभाष विद्या मंदिर, पिंपळवंडी एस. एस.सी. बॅच १९७८ च्या माजी विद्यार्थी मेळावा ‘अगत्य हॉटेल हॉल’ आळेफाटा येथे दिमाखात पार..

जवळपास ६५ माजी विद्यार्थी पती-पत्नीसह हजर..

Spread the love

सुभाष विद्या मंदिर, पिंपळवंडी एस. एस.सी. बॅच १९७८ च्या माजी विद्यार्थी मेळावा ‘अगत्य हॉटेल हॉल’ आळेफाटा येथे दिमाखात पार पडला.Subhash Vidya Mandir, Pimpalwandi S. SC Batch 1978 Alumni Meet held in Dimakh at ‘Agatya Hotel Hall’ Alephata

जवळपास ६५ माजी विद्यार्थी पती-पत्नीसह हजर होते.

आवाज न्यूज : मंचर, वार्ताहर १ मार्च.

गुरुजनांपैकी पैकी  रोडे, भागवत, रोहकले , काचळे, दिवटे, लोखंडे व एम डी वामन आणि तीन शिक्षकेतर कर्मचारी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.सकाळी १०.३० ते सायं ७.३० पर्यंत चाललेल्या मेळाव्यात आमदार अतुलशेठ बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजप नेत्या आशाताई बुचके, जि. प. सदस्य शरदराव लेंडे, शिवसेना युवा नेते मंगेशअण्णा काकडे, माजी पं. स. सभापती संगीताताई वाघ, दिलीप गांजाळे पं स. सदस्य, संतोषनाना खैरे संचालक वि. साखर.का. व पोपटशेठ हाडवळे या मान्यवरांनी कार्यक्रमांस उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.

मेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यानी आपली ओळख व मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थितांना सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, शाल,व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी विद्यार्थी रघुनाथ लेंडे यांनी भूषविले. सूत्रसंचालन अशोक (विष्णु )काकडे, गंगाधर फुलसुंदर, शांताराम वाकचौरे यांनी केले. प्रास्ताविक कुंडलिक काकडे यांनी केले. आभार रोहिदास वामन यांनी मानले.

कार्यक्रमाचे व्यवस्थापन गणपत अभंग, कैलास गुंजाळ, अशोक वाव्हळ, विठ्ठल काचळे, ज्ञानेश्वर रायकर, सुभाष सोनवणे, मधुकर वाघ,अरुण वामन,विठ्ठल वायकर,शारदा कालेकर , किरण काकडे यांनी केले. मेळावा सर्व माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी यांच्या सक्रिय सहभागमुळे व पाठिंब्यामुळे यशस्वी झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!