ताज्या घडामोडी

श्री. राजेश जाधव,क्रीडाशिक्षक वरवडे हायस्कूल भागशाळा खंडाळा यांना गुरुवंदना पुरस्कार जाहीर

Spread the love

श्री. राजेश जाधव क्रीडाशिक्षक वरवडे हायस्कूल भागशाळा खंडाळा हायस्कूल, वाटद-खंडाळा, ता. जि. रत्नागिरी यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ’ केवळ बातम्या प्रसिद्ध करणारे दैनिक नसून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, या समाजातील मूलभूत क्षेत्रांना समतोलपणे समाजापुढे आणणारे एक निस्पृह, निष्पक्ष, निर्भय, परंतु तितकेच विश्वासहार्य व्यासपीठ आहे.

‘सकाळ’ने नेहमीच सामाजिक जाणीव ठेवून वाटचाल केलेली आहे. समाजाच्या विकासासाठी जे जे शक्य होईल ते नेहमीच करण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला आहे. ‘सकाळ’ने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. चांगल्या व नव नवीन उपक्रमांमध्ये नेहमीच क्रियाशील सहभाग घेण्याचे ‘सकाळ’चे धोरण आहे.या उपक्रमातीलच एक भाग म्हणून ‘सकाळ’च्या वतीने ‘सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ या अंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्याचे नियोजन केले आहे.आम्हाला विशेष आनंद होत आहे की, आमच्या विशेष निवड समितीने आपल्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन आपणास ‘गुरुवंदना’ या पुरस्काराने सन्मानित करण्याचे नियोजन केले आहे.तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास आपण आवर्जून उपस्थित राहावे, ही विनंती. दिनांक व वेळ सोमवार दि. ३१ ऑक्टोबर २०२२, सकाळी ११.०० वा. स्थळ – हॉटेल सयाजी, मेघमल्हार हॉल, कोल्हापूर.
सदर निवडपत्र निखिल पंडितराव, कार्यकारी संपादक,आनंद शेळके सहा. सरव्यवस्थापक (जाहिरात) यांनी पाठवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!