आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहनांची व्यवस्था..

दहावी परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आमदार सुनील शेळके यांनी १०९ मोफत वाहनांची व्यवस्था केली आहे.

Spread the love

विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहनांची व्यवस्था.. Arrangement of free vehicles for students..

दहावी परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आमदार सुनील शेळके यांनी १०९ मोफत वाहनांची व्यवस्था केली आहे.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ४ मार्च.

आमदार शेळके हे गेल्या चार पाच वर्षांपासून मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वाहनांची व्यवस्था करतात. यावर्षी ही आंदर मावळ भागातील विद्यार्थ्यांसाठी ४७ वाहने, नाणे मावळ भागासाठी २० वाहने, पवन मावळ भागासाठी ३८ वाहने याशिवाय किन्हई येथे २ व लोणावळा येथे २ अशी एकूण १०९ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

रामभाऊ परुळेकर विद्यालय, पु. वा. परांजपे विद्यामंदिर तळेगाव, तुकाराम विद्यालय देहू, सेंड ज्युड हायस्कूल, शिवाजी विद्यालय देहूरोड, न्यू इंग्लिश स्कूल वडगाव, पवना विद्यामंदिर पवनानगर, नेहरू विद्यालय कामशेत, न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड, बापूसाहेब भोंडे हायस्कूल, ऑक्सिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल लोणावळा या केंद्रांमध्ये। परीक्षार्थीची बसण्याची व्यवस्था आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!