ताज्या घडामोडी

सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप, १७० विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी ता. ३०
सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग तर्फे स्व. विद्या विनोद अधिकारी व अन्यदाते विद्यार्थी गुणगौरव व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर नागझरी येथील नामदेव भाऊ पाटील सभागृहात रविवारी( दि.३०) पार पडले.

या सोहळ्याचे उदघाटन नावझे येथील श्री गणेश कृषक बचत गटाचे संस्थापक प्रमोद सोगले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास अतिथी म्हणून महेश पाटील, शुभम अधिकारी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशाल पवार उपस्थित होते.

विशाल पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले, विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या जीवनामध्ये विशिष्ट ध्येय निश्चित करावे. आपण निश्चित केलेले ध्येय प्राप्त करत असतांना जरी अपयश आले तरी खचून जाऊ नये. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. काम, व्यवसाय कोणताही असू द्या, नावापेक्षा कामाला महत्व द्या. जीवनात अनेक संघर्ष येत असतात. मात्र या संघर्षामधून योग्य ती वाट काढत ध्येय गाठायचे असते असे सांगून आपल्या जीवनातील अनेक चढ-उतार सांगितले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सोगले होते. सोगले यांनी प्रास्ताविकामध्ये, विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांचा आणि शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याने आजच्या या गुणगौरव समारंभात विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचा सुद्धा सत्कार होणार आहे. विद्यार्थ्यांची वाढती गुणवत्ता हीच समाजाची खूप मोठी संपत्ती आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे असे सांगून मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. मंडळाचे चिटणीस कल्पेश पवार यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

या गुणगौरव सोहळ्यामध्ये पालघर तालुक्याच्या पूर्व विभागातील ४७ गावांमधील एकूण १७० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे विश्वस्त भालचंद्र पाटील, सुनील शेलार, चंद्रशेखर नाईक, उपाध्यक्ष योगेश पाटील, विपुल पाटील, सहसचिव नितीन पाटील , उत्तम पाटील, खजिनदार हेमंत पावडे, प्रशांत सातवी तसेच गटचिटणीस, कार्यकारणी सदस्य, महिला प्रतिनिधी, विदयार्थी व पालक, मंडळाचे आजी- माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी विश्वस्त प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष गंगाराम घरत, माजी विश्वस्त हिरा डोंगरे , माजी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, माजी विश्वस्त वैभव पाटील, अच्युत सातवी, कपिल ठाकूर, सुमित पाटील, मोहन पाटील, जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!