ताज्या घडामोडी

विनायक राऊत सर…एक अष्टपैलू व्यक्तीमत्व

Spread the love

विनायक राऊत सर,आपण शैक्षणिक प्रशासनातील अत्यंत नावाजलेले व्यक्तिमत्त्व होय…!!!
स्वतःच्या कुटुंबासारखंच शिक्षण संस्थेच्या विकासासाठी धडपडणारे एक व्यक्तिमत्त्व तुम्ही.. !!!
सर, शालेय विद्यार्थी जीवनापासून ते वयाच्या साठीनंतरही आपल्या जीवनाची वाटचाल सर्वांना प्रेरित करणारी आहे.
कधीही, कुठल्याही कामात थकवा किंवा कंटाळा न करणारे सर म्हणजे आमचे राऊत सर….!
सतत ताजेतवाने आणि कोणत्याही कामात हिरीरिने सहभाग घेणारे आपणच …
मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज असो,जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय असो अथवा गुहागर तालुक्यातील डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली असो आपले प्रगतीच्या दृष्टीने सगळीकडेच सूक्ष्म लक्ष.
मालगुंड व जाकादेवी शालेय अध्यापन कारकिर्दीत गणित विषय अत्यंत साध्या -सोप्या-पद्धतीने शिकवून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लावणारे आपणच.आपल्या गणित विषयाचा सर्वोत्तम निकाल देऊन शाळेचा आणि संस्थेचा लौकिक वाढवणारे सर म्हणजे विनायकर राऊत सर हे वाक्य मला तेथे अधोरेखित करताना माझीच नव्हे अनेकांची मान अभिमानाने उंचावते.
सर,आपणास उपशिक्षकाची
आणि मुख्याध्यापक पदाची मोठी कारकीर्द लाभली. खरच ,आपणास ही कारकीर्द भाग्यशाली ठरली, शिक्षण संस्थेचा विश्वास सार्थ ठरविलात सर.आपल्या शिक्षण संस्थेच्या गरजा ओळखून आपण शिक्षण संस्थेला मोठमोठे देणगीदार मिळवून दिलेत, ही बाब स्तुत्य नि अनुकरणीय आहे,सर..‌!
आपल्या कारकिर्दीची सोनेरी किरणे विद्यार्थी विश्वात तेजाने पसरली अन् समाजमनावर तेवढीच बिंबली.
विद्यार्थीहित, समाजहित लक्षात घेऊन शाळा व ज्युनिअर कॉलेजसह मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अत्यंत नेटकं, अभ्यासपूर्ण नियोजन करून जनमानसात- समाजमनावर प्रभाव पाडून एक आदर्श शिक्षक,आदर्श मुख्याध्यापक आणि आदर्श शिक्षण संस्थेच्या कामकाजाचा उत्तम प्रशासक, सक्रिय सचिव म्हणून आपली आजपर्यंतची वाटचाल अनेकांना आदर्शवत आणि प्रेरक अशीच आहे,सर..!
माननीय राऊत सर, आपल्या वाढदिवसानिमित्त आपले उर्वरित आयुष्य सुखाचे,समृद्धीचे,आनंदाचे, उत्तम आरोग्याचे जावो, अशी मंगल कामना व्यक्त करत असतानाच,आपणाला आयुष्यभर सावलीसारखी साथ देणाऱ्या आदरणीय सौ.विनया राऊत मॅडम, मुलगा विकी, सुनबाई,आपली आई, आपले भाऊ तसेच आपले सर्व नातेवाईक या सर्वांचे जीवन सुखाचे, समृद्धीचे,आनंदाचे जावो,ही सदिच्छा…!!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!