ताज्या घडामोडी

संत साहित्याने समाजाला चांगली दिशा देवून महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमान जोपासला असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्री दि. बा .पाटील

Spread the love

प्रथमेश क्षीरसागर- इस्लामपूर प्रतिनिधीइस्लामपूर दि१ साहित्याच्या तळाशी वेदनेचा स्पर्श असतो त्यामुळेच कसदार साहित्याची निर्मिती होत असते याच वेदनेतून संत साहित्याची निर्मिती झाली संत साहित्याने समाजाला चांगली दिशा देवून महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमान जोपासला असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्री दि. बा .पाटील यांनी व्यक्त केले
ते पन्हाळगडावर संजीवनी नॉलेज सिटीच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरीत संपन्न झालेल्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व भारताचे माजी कायदामंत्री रमाकांत खलप उपस्थित होते या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ एन आर भोसले हे होते श्री पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले भौतिक दृष्ट्या संपन्न झालेल्या समाजाचे मानसिक दृष्ट्या उध्वस्थीकरण होत आहे समाज संस्कृतीचा चेहरा विद्रुप होतो आहे या समाजाला सुंदर व वैचारिक चेहरा देण्याचे काम साहित्य करेल पत्रकारिता आणि साहित्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे पत्रकारच साहित्याला दररोज नवीन विषय देत असतात साहित्यातल्या नव्या पिढीला अन्वेषण दृष्टी लाभली आहे त्यामुळे केवळ प्रश्न न मांडता प्रश्नांची उत्तरे शोधणार साहित्य निर्माण होते आहे ही साहित्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाची गोष्ट आहे यावेळी श्री रमाकांत खलप आपल्या भाषणात म्हणाले देशातील गड किल्ले हे आपले प्रेरणास्थान असून भाषावर प्रांतरचना झाल्याने चिंता करण्याची गरज नाही समाजाने प्रत्येक भाषेतील साहित्याचा सन्मान केला पाहिजे विविध बोलीभाषेमुळे साहित्य संपन्न झाले आहे या प्रसंगी महाराष्ट्रातील काही मान्यवर साहित्यिकांना उत्कृष्ट वांग्मय निर्मितीचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले समारंभासाठी डॉ सतीश तराळ एम डी रावण डॉ प्रतिमा इंगोले अजित रणदिवे डॉ एच वाय शिंदे डॉ अजित सिंग राणे डी बी जगत्परिया कॅप्टन गणपतराव घोडके धनाजी घोरपडे आप्पासाहेब खोत तुळशीदास बोबडेअॅड.बी.एस.पाटील अदि मान्यवर उपस्थित होते संमेलनाचे प्रास्ताविक डॉ शिवचरण उज्जैनकर यांनी केले सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी राजकुमार कांकरिया यांनी केले तर आभार डॉ श्रीकांत पाटील यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!