ताज्या घडामोडी

मालेवाडीत राष्ट्रवादी तर्फे संघटना आपल्या दारी उपक्रम

Spread the love

असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मालेवाडी येथे मधुकर पाटोळे यांच्या निवासस्थानी संघटना आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला.वाळवा तालुका अध्यक्ष सागर चव्हाण ,सुधीर गायकवाड,अविनाश गायकवाड, शोहेब मुजावर ,दत्ता देसाई आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच सरपंच मानसिंग पाटील, तांदुळवाडीचे सरपंच रमेश पाटील, राजारामबापू पाटील सह.बँकेचे संचालक संभाजी पाटील,तंटामुक्तीचे अध्यक्ष विलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कोळेकर, इंजिनिअर रणजित जाधव,भास्कर पाटील, अजिंक्य पाटील आदींचा सत्कार मधुकर पाटोळे व सुरेश सुर्यवंशी यांनी केला.
त्यानंतर मधुकर पाटोळे यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला.आतापर्यंत सुमारे श्री मधुकर पाटोळे व सुरेश सुर्यवंशी यांनी असंघटित चारशे कामगारांना विविध योजनेचा लाभ मिळवून दिला. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. तसेच पंधरा कामगारांच्या घरकुलाचे प्रस्ताव पाठवले असून दोन मंजूर झाले आहेत.यावेळी या  योजनेची श्री संभाजी पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. या योजनेची मालेवाडीतील मधुकर पाटोळे व सुरेश सुर्यवंशी यांनी अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली आहे असे स्पष्ट केले.या प्रसंगी श्री सागर चव्हाण व अविनाश गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. यापुढे नव नवीन लोकांची नोंदणी करावी व सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे असे स्पष्ट केले.यावेळी महिलांची उपस्थिती चांगली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासराव कोळेकर यांनी केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!