आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

मावळ तालुक्यातील सर्वात मोठा सार्वजनिक दहीहंडी उत्सव शुक्रवारी (19 ऑगस्ट) तळेगाव स्टेशन विभागात साजरा होणार

मराठी हिंदी मालिकांच्या सृष्टीतील पाच कलाकारांची उपस्थिती तसेच पुणे, बारामती, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील नामवंत गोविंदा पथकांचा सहभाग खास आकर्षण असणार आहे..... सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष शेखर मु-हे, संतोष मोरे आणि ऍड. संविद पाटील यांनी सांगितले.

Spread the love

  आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी १८ ऑगष्ट 

मावळ तालुक्यातील सर्वात मोठा सार्वजनिक दहीहंडी उत्सव शुक्रवारी (19 ऑगस्ट) तळेगाव स्टेशन विभागात साजरा होणार…

असून मराठी हिंदी मालिकांच्या सृष्टीतील पाच कलाकारांची उपस्थिती तसेच पुणे, बारामती, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील नामवंत गोविंदा पथकांचा सहभाग खास आकर्षण असणार आहे.

माजी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांच्या पुढाकारातून पाच वर्षांपूर्वी परिसरातील सर्व मंडळांनी एकत्रितपणे दहीहंडी उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. कोविड काळात दोन्ही वर्षे असा कार्यक्रम न झाल्याने यंदा तो अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न असल्याचे सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष शेखर मु-हे, संतोष मोरे आणि ऍड. संविद पाटील यांनी सांगितले.

तळेगाव स्टेशन परिसरातील नगरपालिकेच्या संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेच्या मैदानावर होणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी अमिषा पटेल, पूजा बिररी, शरयू सोनवणे, समृद्धी केळकर या अभिनेत्री तसेच आर जे शोनाली आणि अभिनेता विजय आंदळकर उपस्थित राहणार आहेत. बक्षिसांची एकूण रक्कम 7 लाख 77 हजार 777 इतकी असून महिला गोविंदा पथकाच्या विजेत्यांचा विशेष सन्मानही करण्यात येणार असल्याचे मुख्य संयोजक संतोष मोरे आणि आशिष खांडगे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!