आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणजे मराठी सारस्वताच्या गळ्यातील ‘कौस्तुभमणी – डॉ.विशाखा टुमणे

कलापिनी, साने गुरुजी कामाला आणि समर्थ सेवा मंडळ, तळेगाव दाभाडे आयोजित मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर..

Spread the love

श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणजे मराठी सारस्वताच्या गळ्यातील ‘कौस्तुभमणी – डॉ.विशाखा टुमणे’….

आवाज न्यूज: विश्वास देशपांडे, १८ ऑगष्ट 

श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणजे मराठी सारस्वताच्या गळ्यातील ‘कौस्तुभमणी’ असे उद्गार मनाचे श्लोक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी डॉ.विशाखा टुमणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात काढले. समर्थांनी या श्लोकांतून मनाला केलेला उपदेश हा कालसापेक्ष असून लहान थोर सर्वांना अनुकरणीय आहे. समाजाला सुधृढ बनविण्यासाठी बलोपासना ही समर्थांनी समाज मनात रुजविली.

कलापिनी,साने गुरुजी कथामाला व समर्थ सेवा मंडळ आयोजित मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा या वेळी मावळ तालुका पातळीवर आयोजित करण्यात आल्या होत्या, या स्पर्धेला बालगटा पासून ते प्रौढ गटा पर्यंत उदंड प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत २८७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.

पिनाकी विलास बर्गे (चिंचवड) व मृदुला मोरेश्वर कुलकर्णी (तळेगाव) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विजेत्यांना रोख पारीतोषिकांबरोबरच शालोपयोगी वस्तूंचेही वाटप करण्यात आले.ही पारितोषिके कै.सरस्वती गजानन शिंत्रे व कै.मंगला मोरेश्वर होनप यांच्या स्मरणार्थ वितरण करण्यात आली.
या शानदार सोहळ्याचे सूत्र संचालनस्पर्धा प्रमुख अशोक बकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती ढमाले यांनी केले.
कार्यक्रमाचे उत्तम आयोजन मोरेश्वर होनप,सुभाष नाईक गुरुजी, विनया मायदेव,चेतन पंडित, शार्दुल गद्रे,सायली रौन्धळ,आरती पोलावार आणि स्वास्थ्य योगी,सर्व बालभवन प्रशिक्षकांनी केले.

कलापिनी, साने गुरुजी कामाला आणि समर्थ सेवा मंडळ, तळेगाव दाभाडे आयोजित मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा २०२२ स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे. :-
गट : बालवाडी/ ज्यू.सिनिअर के.जी.
प्रथम क्रमांक विभागून -_-
स्वरांग मंगेश साळुंखे, पैसाफंड प्राथ.शाळा व
राधा बेडेकर, किडझी स्कूल.
द्वितीय क्रमांक विभागून ——
सारंग संजय इरकल, पैसाफंड प्राथ. शाळा व पालवी योगेश कुलकर्णी.
गट. : १ ली, २री. :
प्रथम क्रमांक विभागून. :
स्पृहा सचिन आल्हाट, व यामिनी रविंद्र पाटील, आदर्श विद्या मंदिर.
गट ५ वी ते ७ वी. :-
प्रथम क्रमांक विभागून :
स्वरा पन्हाळे, सरस्वती विद्या मंदिर व
श्रेयस सुहास महाले, आदर्श विद्या मंदिर,
द्वितीय क्रमांक पार्थ गवळी,माउंट सेंट ॲन.
गट.,….८ वी ते १० वी. :-
प्रथम क्रमांक गौरी विठ्ठल मुळे, डॉ.अण्णासाहेब चौबे स्कूल, द्वितीय क्रमांक गायत्री बाळासाहेब मगर, ॲड.पु.वा.परांजपे
खुला गट. :-
प्रथम क्रमांक अशोक सोनाळकर,
द्वितीय क्रमांक सारीका अमोल नवले,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!