ताज्या घडामोडी

कौसल्या कराड रुग्णालय येथे मोफत डोळे तपासणी व वाचनाचा चष्मा वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

गोळेवाडी, डोणजे येथील आपलं घर चे कौसल्या कराड ग्रामीण रुग्णालय तर्फे खास जेष्ठांसाठी मोफत डोळे तपासणी व वाचनाचा चष्मा वाटप शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत खामगाव मावळच्या विद्यमान उपसरपंच सौ. मेघाताई हनुमंत दारवटकर तसेच मावळा जवान संघटने पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण तात्या दारवटकर यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये डोळे व इतर तपासणी अशा ४५ जेष्ठांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी डॉ. अभिजीत खके, सिस्टर अनुश्री, सिस्टर रूपाली, अतुल दादा यांची मोलाची साथ मिळाली. मावळा जवान संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण तात्या दारवटकर म्हणाले, डोंगराळ भागांमध्ये वैद्यकीय कोणतेच सुविधा नसल्याकारणाने जेष्ठांची समस्या जाणून घेऊन शिबिर राबवण्यात आल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!