ताज्या घडामोडी

२०२२ पर्यंतची गायराण व सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत

Spread the love

दलित महासंघाच्या वतीने वडूज (खटाव )तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन .
सविस्तर असे कि वडुज ता. खटाव येथे दि.२१/११/२०२२ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
तसेच पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या महापालिका क्षेत्रामधील अतिक्रमण धारकांना अतिक्रमण नियमीत करण्यासाठी वरचेवर मुदतवाढ देण्यात आली त्याप्रमाणे ग्रामीण भागातील गायराण व सरकारी जमीनिवरील २०२२पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्यात यावी.या प्रमुख मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने वडुज (खटाव) तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
गायरान जमिनीवरील २०२२ पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत या मागणीसाठी राज्यभर तालुका, जिल्हा निहाय रस्त्यावरच्या लढाई बरोबरच न्यायालयीन लढासुद्धा दलित महासंघाचे वतिने करण्यात येणार आहे.
चोराडे ता.खटाव जि.सातारा येथिल भुमापन क्र.१४६०/२१ या गायराण जमीनीवर दोन तिन पिढ्या निवारा करुन मोलमजुरी कष्ट करीत उपजिवीका चालवित आहे.अनेक कुटूंबाना ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत मिळकत नमुना नंबर ८ अ चे उतारे प्राप्त झालेले आहेत.अशा सर्व भुमिहीन शेतमजूर, अनुसूचित जमाती जमाती , भटके विमुक्त व अत्यल्प भूधारकांची २०२२ पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्यात येवून सर्वच गरीबांच्या घरांना संरक्षण देण्यात यावे.अशी आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.
या आंदोलनामध्ये दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, सातारा जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, बहुजन समता पार्टी चे जिल्हाध्यक्ष राम दाभाडे, पारधी मुक्ती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत काळे, खटाव तालुका प्रभारी शंकर तुपे,चोराडे येथील जेष्ठ नेते सुहास पिसाळ,माजी सरपंच शिवाजी अवघडे, कृष्णत अवघडे, सुधाकर जाधव, नवनाथ अवघडे,बाळू चव्हाण, संजय अवघडे,विलास पवार,कुसूम चव्हाण, शांताराम पिसाळ,विमल गुजले, विनोद अवघडे,अर्जुन मोहिते, पोपट चव्हाण,स्वाती लोकरे,रेखा माळी,अधिकराव अवघडे,संजन मदने, दिनकर पिसाळ यांचेसह महिला भगिनींचा आंदोलनामध्ये सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!