ताज्या घडामोडी

दरोरोज 250 डबे सेवा सुरू

Spread the love

समतोल अन्नछत्राचा टप्पा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने गरजुंना अन्नदान मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे फुटपाथवर सामान विकणारे रोज जेवणाची अडचण असणारे बाहेरचे नको ते पदार्थ खातात व आजाराला निमंत्रण देतात कारण अनेकांचे कुटुंब नाही अशा व्यक्ती चा शोध घेऊन त्यांच्या अन्नाची गरज लक्षात घेऊन डबे सुरू केले आहे विशेष म्हणजे हे फक्त 20 रुपये मध्ये आहे जेवनाची किंमत असावी म्हणून नाही तर निशुल्कच आहे
डाळ, भात,भाजी ,चपाती संपूर्ण जेवण …
साधारण 30 डबे सुरू झाले आहे अनेक सिनियर सिटिझन अन्नछत्रातील मदत घेण्यासाठी प्रयत्नात आहेत
समतोल सेवा नक्की प्रयत्न करेल आम्हाला आपल्या सर्वांचे सहकार्य मिळाले पाहिजे कारण समाज आपलाच आहे आणि त्या समाजात आपणही राहत आहोत *एकमेकांना साह्य करु अवघे धरू सुपंथ* याप्रमाणे समतोल सेवा कार्य करीत आहे साधारण रोज 250 लोकांना गरजुंना अन्नदान होत आहे
*ठाणे येथे तलाव पाळी ,गावदेवी मैदान ,भाजीमार्केट ,स्टेशन रोड ,सिव्हिल हाँस्पीटल या ठिकाणी गरजुंना अन्नदान केले जाते प्रत्यक्ष अनुभव खूप आनंद देतो आपणही येऊन घेऊ शकता..
आपणही या सत्कर्म मध्ये सहभागी होऊ शकता.।।

विजय जाधव
*समतोल सेवा* *9892961124*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!