ताज्या घडामोडी

संवादशील वक्ते : यशवंतराव चव्हाण . प्रा. डॉ. संजय थोरात

Spread the love

वक्तृत्व हे जनसंवादाचे प्रभावी माध्यम आहे. राज्यातील कृषी औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी या प्रभावी माध्यमाचा सखोल अभ्यास केला होता. श्रोत्यांशी हितगुज करणारे ते सुसंस्कृत वक्ते होते. सार्वजनिक जीवनात चारित्र्यनिर्मिती सुजाण नागरिकत्व विकसित करणे या त्यांच्या बोलण्याच्या प्रेरणा होत्या. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी वक्तृत्वाला नेतृत्वाचे साधन म्हटले आहे. श्री. चव्हाण यांच्या नेतृत्वाचा प्रभावी वक्तृत्व हा प्रमुख आधार होता. ज्येष्ठ साहित्यीक प्रा. ना. सी. फडके यांनी म्हटले आहे की, ‘यशवंतरावांचे पडलेले भाषण कधी ऐकले नाही. फसलेला लेख वाचला नाही.’ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे यशवंतराव चव्हाण बालवयापासूनच वक्तृत्वाचा व्यासंग जपताना दिसतात. आचार्य अत्रे , स्वातंत्र्यवीर सावरकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले या राज्यातील नामवंत वक्त्याप्रमाणे श्री. चव्हाण यांचे वक्तृत्व शालेय जीवनापासून चर्चेत आले. टिळक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेतील यशानंतर ते पुणे येथील नूतन मराठी विद्यालयातील वक्तृव स्पर्धेसाठी गेले. या स्पर्धेला पुण्यापर्यंत जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. श्री. शिवाजीराव बटाणे यांनी त्यांना पुण्याला जाण्यासाठी पैसे दिले. नूतन मराठी विद्यालयातील स्पर्धेत स्पर्धेचा विषय आयत्यावेळी दिला जात असे. यशवंतराव चव्हाणांना ‘ग्राम सुधारणा’ हा विषय देण्यात आला. आपल्या शालेय जीवनात देखील यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण परिसराचा अनुभव वाचन व चिंतन यांच्या जोरावर ग्रामसुधारणा या विषयावर प्रभावी मांडणी केली. त्यांच्या भाषणामुळे श्रोत्यांबरोबर परीक्षक देखील प्रभावित झाले. परीक्षकांनी त्यांना बोलण्यासाठी आणखी दहा मिनिटे वेळ वाढवून दिली. या स्पर्धेप्रसंगी साहित्यसम्राट न. चि. केळकर उर्फ तात्यासाहेब उपस्थित होते. ग्रामसुधारणा या विषयावरील सुंदर मांडणीमुळे यशवंतराव चव्हाणांना दीडशे रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. ग्रामीण भागातील तरुणाच्या वक्तृत्वाला ही पहिली अधिकृत समाजमान्यता होती. या भाषणाला तात्यासाहेब केळकरांचे आशीर्वाद मिळाले. १९३२ ला यशवंतराव चव्हाण कराड येथे कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झाले. त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारविरुद्ध चळवळ केल्यामुळे सरकारने त्यांच्या आयुष्यातील वक्तृत्व स्पर्धेत मिळालेले हे पहिले दीडशे रुपयांचे बक्षीस दंडापोटी सरकार जमा केले. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेताना यशवंतराव कार्यकर्त्यांच्या बैठकांना संबोधित करत होते. कराड येथे कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर त्यांनी कार्यकर्त्यांना देशाच्या स्वातंत्र्याची प्रतिज्ञा सांगितली. स्वातंत्र्यपूर्व काळात ते काँग्रेसच्या निवडणूक प्रचारसभातून ते काँग्रेसला विजयी करा असे आवाहन करीत असत. श्री. चव्हाण साहेबांना वक्ता म्हणून घडवण्यात कुटुंबाचा देखील वाटा आहे. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे शिक्षण. रामायणात सीता केंद्रवर्ती आहे, तिच्या करुणेची कहाणी म्हणून रामायणाला सीतायाण म्हणावे अशा आईच्या शिकवणुकीमुळे त्यांना वेगळा विचार करण्याची सवय लागली. ग्रामीण लोकजीवनातील कुस्ती, तमाशा, भजन, कीर्तन, नाटक हे स्रोत आणि वाचन यामुळे त्यांची वक्ते म्हणून जडणघडण झाली. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या वक्तृवविषयी लेखन केले आहे. त्यांचा हा लेख रामप्रधान यांनी संपादित केलेल्या ‘शब्दांचे सामर्थ्य’ या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या लेखात श्री. चव्हाण म्हणतात, ‘मला भाषणांची हौस आहे. विचारांची स्पष्टता, वाचन, चिंतन, आत्मविश्वास, संभाषण पद्धतीची शैली या बाबी भाषणात महत्वाच्या आहेत. सार्वजनिक सभा, समारंभ, कार्यकर्त्यांचे मेळावे, विधिमंडळ, संसद या ठिकाणी वेगळ्या प्रकारची भाषणे करावी लागतात. मी इंग्रजी वाचन करून भाषणाची देशी शैली विकसीत केली. लोकांना नीट मांडणी केलेले विचार ऐकण्यात आनंद वाटतो. सार्वजनिक ठिकाणी दहा – पंधरा ते पंचेचाळीस मिनिटे आणि संसदेत जास्तीत जास्त दीड तास भाषण करण्याची मी सवय विकसीत केली आहे.’ त्यांच्या मते भाषणाची समर्पकता हा महत्वाचा गुण होय. आर्थिक, सामाजिक परिवर्तन परिवर्तन व परराष्ट्र संबंध हे भाषणासाठी त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांनी वक्तृत्वाची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते भाषण म्हणजे सवांद. एका माणसाने अनेक माणसांशी केलेले संभाषण म्हणजे भाषण होय. यशवंतराव चव्हाणांच्या या व्याख्येत माणसा – माणसामधील जिव्हाळा आणि परस्पर संबंध अधोरेखित झाला आहे. श्री. चव्हाण यांचा आवाज आर्जवी होता. खादीचे धोतर, शर्ट आणि टोपीचा विशिष्ट कोन अशा पेहरावात श्री. चव्हाण कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याप्रमाणे सर्वांशी सहज संवाद साधत. श्रोत्यांची कितीही गर्दी असली तरी प्रत्येकाला ते आपल्याशीच संवाद साधत आहेत, असे वाटत राही. प्रसंगानुरूप आणि औचित्यपूर्ण बोलणे हे यशवंतराव चव्हाणांच्या भाषणाचे वैशिष्ट्य होते. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी राज्याची स्थापना हे साधन असून विकास हे साध्य आहे, आपले राज्य मराठा नव्हे तर मराठी असेल अशी भूमिका मांडली. एका साहित्य सभेच्या उदघाटनप्रसंगी ते म्हणाले, “माणसाने भाषा निर्माण केली. आता भाषेला माणसं निर्माण करावी लागणार आहेत.” राजकारणी मंडळींनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असावे की नसावे, अशी चर्चा सतत सुरु असते. साहित्यिकांशी संवाद साधताना त्यांनी सार्वजनिक जीवनातील सभ्यतेचा निर्देशांक सतत चढता ठेवला. इचलकरंजी येथे पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनात त्यांनी व्यासपीठाऐवजी समोरच्या श्रोत्यांमध्ये बसणे पसंत केले. राजकारणी व साहित्यिक यांच्यासंदर्भात त्यांनी समतोल भूमिका घेतली. राजकारणी व साहित्यिक परस्परांना मार्गदर्शन करतात. असा माध्यम मार्ग त्यांनी निवडला. साहित्यिक व राजकारणी हे शब्दबंधू होत, असे ते म्हणाले. राज्यातील मुख्यमंत्रीपद सोडून देशाच्या सरंक्षणासाठी त्यांनी संरक्षण मंत्रिपद स्वीकारले. सगळीकडे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असा सूर होता. मात्र राज्यातील लोकांचा निरोप घेताना यशवंतराव चव्हाण म्हणाले, “सासरी जावेसे वाटते. पण माहेरपण तुटत नाही, अशी माझी अवस्था झाली आहे. ” १९७४ ला कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या आवारात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांचे अनावरण यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते झाले. या प्रसंगी श्री. चव्हाण म्हणाले, “महाराजांनी डोंगरी किल्ले बांधले. पण त्या पेक्षा निष्ठावान अनुयायांचे पथक निर्माण केले ही बाब महत्वाची आहे.” श्री. चव्हाण आपल्या भाषणातून समकालीनांच्या कर्तृत्वच्या अचूक नोंद घेत असत. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, “अण्णांनी सामुदायिक शिक्षणाची चळवळ सुरु केली. त्यांनी निर्माण केलेल्या शाळा सामाजिक व सांस्कृतिक स्थित्यंतर घडवून आणणाऱ्या प्रयोगशाळा आहेत. श्री. यशवंतराव चव्हाण करंजवणे येथे धरणाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी धरणग्रस्तांच्या व्यथा अधोरेखित करताना ते म्हणाले, “प्रकल्पग्रस्तांचे दुःख मोठे आहे. पिढ्यान पिढ्यांच्या सहवासानंतर होणारा दुरावा बैचेन करणारा आहे.” आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उत्तम इंग्रजी बोलणारे यशवंतराव चव्हाण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी सॉक्रेटिसप्रमाणे प्रशोनोत्तर करीत संवाद साधत. ते शेतकऱ्यांच्या सभेत शेतकऱ्यांना प्रश्न विचारत. २७ उणे ९ किती होतात, बरेच जण १८ असे उत्तर देत. या उत्तराबद्दल ते म्हणत, ‘अरे बाबांनो शेतकऱ्यांच्या आयुष्यातील पावसाची ९ नक्षत्रे वजा केल्यावर फक्त शून्य उरते.’ स्वातंत्र्यपूर्व काळात तुरुंगात असताना ते चर्चासत्रे, बौद्धिके यात भाग घेत. त्यांनी तुरुंग हेच आपले विद्यापीठ होते, असे म्हटले आहे. ‘सह्याद्रीचे वारे’ आणि ‘युगांतर’ हे त्यांचे भाषण संग्रह प्रसिद्ध आहेत. आपल्या भाषणातून ते लोकशाही, समाजवाद, मानवता या मुल्याना महत्व देत. खुमासदार शैली आणि अभिजात आशय यांच्या माध्यमातून तत्वचिंतक यशवंतराव चव्हाणांची ओळख होत असे. समतोल, अभ्यासपूर्ण, वस्तुनिष्ठ विचार मांडणारे यशवंतराव चव्हाणांचे वक्तृत्व हे त्यांच्या नेतृत्वाचे प्रमुख साधन होते.वक्तृत्व हे जनसंवादाचे प्रभावी माध्यम आहे. राज्यातील कृषी औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी या प्रभावी माध्यमाचा सखोल अभ्यास केला होता. श्रोत्यांशी हितगुज करणारे ते सुसंस्कृत वक्ते होते. सार्वजनिक जीवनात चारित्र्यनिर्मिती सुजाण नागरिकत्व विकसित करणे या त्यांच्या बोलण्याच्या प्रेरणा होत्या. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी वक्तृत्वाला नेतृत्वाचे साधन म्हटले आहे. श्री. चव्हाण यांच्या नेतृत्वाचा प्रभावी वक्तृत्व हा प्रमुख आधार होता. ज्येष्ठ साहित्यीक प्रा. ना. सी. फडके यांनी म्हटले आहे की, ‘यशवंतरावांचे पडलेले भाषण कधी ऐकले नाही. फसलेला लेख वाचला नाही.’ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे यशवंतराव चव्हाण बालवयापासूनच वक्तृत्वाचा व्यासंग जपताना दिसतात. आचार्य अत्रे , स्वातंत्र्यवीर सावरकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले या राज्यातील नामवंत वक्त्याप्रमाणे श्री. चव्हाण यांचे वक्तृत्व शालेय जीवनापासून चर्चेत आले. टिळक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेतील यशानंतर ते पुणे येथील नूतन मराठी विद्यालयातील वक्तृव स्पर्धेसाठी गेले. या स्पर्धेला पुण्यापर्यंत जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. श्री. शिवाजीराव बटाणे यांनी त्यांना पुण्याला जाण्यासाठी पैसे दिले. नूतन मराठी विद्यालयातील स्पर्धेत स्पर्धेचा विषय आयत्यावेळी दिला जात असे. यशवंतराव चव्हाणांना ‘ग्राम सुधारणा’ हा विषय देण्यात आला. आपल्या शालेय जीवनात देखील यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण परिसराचा अनुभव वाचन व चिंतन यांच्या जोरावर ग्रामसुधारणा या विषयावर प्रभावी मांडणी केली. त्यांच्या भाषणामुळे श्रोत्यांबरोबर परीक्षक देखील प्रभावित झाले. परीक्षकांनी त्यांना बोलण्यासाठी आणखी दहा मिनिटे वेळ वाढवून दिली. या स्पर्धेप्रसंगी साहित्यसम्राट न. चि. केळकर उर्फ तात्यासाहेब उपस्थित होते. ग्रामसुधारणा या विषयावरील सुंदर मांडणीमुळे यशवंतराव चव्हाणांना दीडशे रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. ग्रामीण भागातील तरुणाच्या वक्तृत्वाला ही पहिली अधिकृत समाजमान्यता होती. या भाषणाला तात्यासाहेब केळकरांचे आशीर्वाद मिळाले. १९३२ ला यशवंतराव चव्हाण कराड येथे कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झाले. त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारविरुद्ध चळवळ केल्यामुळे सरकारने त्यांच्या आयुष्यातील वक्तृत्व स्पर्धेत मिळालेले हे पहिले दीडशे रुपयांचे बक्षीस दंडापोटी सरकार जमा केले. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेताना यशवंतराव कार्यकर्त्यांच्या बैठकांना संबोधित करत होते. कराड येथे कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर त्यांनी कार्यकर्त्यांना देशाच्या स्वातंत्र्याची प्रतिज्ञा सांगितली. स्वातंत्र्यपूर्व काळात ते काँग्रेसच्या निवडणूक प्रचारसभातून ते काँग्रेसला विजयी करा असे आवाहन करीत असत. श्री. चव्हाण साहेबांना वक्ता म्हणून घडवण्यात कुटुंबाचा देखील वाटा आहे. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे शिक्षण. रामायणात सीता केंद्रवर्ती आहे, तिच्या करुणेची कहाणी म्हणून रामायणाला सीतायाण म्हणावे अशा आईच्या शिकवणुकीमुळे त्यांना वेगळा विचार करण्याची सवय लागली. ग्रामीण लोकजीवनातील कुस्ती, तमाशा, भजन, कीर्तन, नाटक हे स्रोत आणि वाचन यामुळे त्यांची वक्ते म्हणून जडणघडण झाली. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या वक्तृवविषयी लेखन केले आहे. त्यांचा हा लेख रामप्रधान यांनी संपादित केलेल्या ‘शब्दांचे सामर्थ्य’ या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या लेखात श्री. चव्हाण म्हणतात, ‘मला भाषणांची हौस आहे. विचारांची स्पष्टता, वाचन, चिंतन, आत्मविश्वास, संभाषण पद्धतीची शैली या बाबी भाषणात महत्वाच्या आहेत. सार्वजनिक सभा, समारंभ, कार्यकर्त्यांचे मेळावे, विधिमंडळ, संसद या ठिकाणी वेगळ्या प्रकारची भाषणे करावी लागतात. मी इंग्रजी वाचन करून भाषणाची देशी शैली विकसीत केली. लोकांना नीट मांडणी केलेले विचार ऐकण्यात आनंद वाटतो. सार्वजनिक ठिकाणी दहा – पंधरा ते पंचेचाळीस मिनिटे आणि संसदेत जास्तीत जास्त दीड तास भाषण करण्याची मी सवय विकसीत केली आहे.’ त्यांच्या मते भाषणाची समर्पकता हा महत्वाचा गुण होय. आर्थिक, सामाजिक परिवर्तन परिवर्तन व परराष्ट्र संबंध हे भाषणासाठी त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांनी वक्तृत्वाची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते भाषण म्हणजे सवांद. एका माणसाने अनेक माणसांशी केलेले संभाषण म्हणजे भाषण होय. यशवंतराव चव्हाणांच्या या व्याख्येत माणसा – माणसामधील जिव्हाळा आणि परस्पर संबंध अधोरेखित झाला आहे. श्री. चव्हाण यांचा आवाज आर्जवी होता. खादीचे धोतर, शर्ट आणि टोपीचा विशिष्ट कोन अशा पेहरावात श्री. चव्हाण कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याप्रमाणे सर्वांशी सहज संवाद साधत. श्रोत्यांची कितीही गर्दी असली तरी प्रत्येकाला ते आपल्याशीच संवाद साधत आहेत, असे वाटत राही. प्रसंगानुरूप आणि औचित्यपूर्ण बोलणे हे यशवंतराव चव्हाणांच्या भाषणाचे वैशिष्ट्य होते. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी राज्याची स्थापना हे साधन असून विकास हे साध्य आहे, आपले राज्य मराठा नव्हे तर मराठी असेल अशी भूमिका मांडली. एका साहित्य सभेच्या उदघाटनप्रसंगी ते म्हणाले, “माणसाने भाषा निर्माण केली. आता भाषेला माणसं निर्माण करावी लागणार आहेत.” राजकारणी मंडळींनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असावे की नसावे, अशी चर्चा सतत सुरु असते. साहित्यिकांशी संवाद साधताना त्यांनी सार्वजनिक जीवनातील सभ्यतेचा निर्देशांक सतत चढता ठेवला. इचलकरंजी येथे पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनात त्यांनी व्यासपीठाऐवजी समोरच्या श्रोत्यांमध्ये बसणे पसंत केले. राजकारणी व साहित्यिक यांच्यासंदर्भात त्यांनी समतोल भूमिका घेतली. राजकारणी व साहित्यिक परस्परांना मार्गदर्शन करतात. असा माध्यम मार्ग त्यांनी निवडला. साहित्यिक व राजकारणी हे शब्दबंधू होत, असे ते म्हणाले. राज्यातील मुख्यमंत्रीपद सोडून देशाच्या सरंक्षणासाठी त्यांनी संरक्षण मंत्रिपद स्वीकारले. सगळीकडे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असा सूर होता. मात्र राज्यातील लोकांचा निरोप घेताना यशवंतराव चव्हाण म्हणाले, “सासरी जावेसे वाटते. पण माहेरपण तुटत नाही, अशी माझी अवस्था झाली आहे. ” १९७४ ला कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या आवारात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांचे अनावरण यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते झाले. या प्रसंगी श्री. चव्हाण म्हणाले, “महाराजांनी डोंगरी किल्ले बांधले. पण त्या पेक्षा निष्ठावान अनुयायांचे पथक निर्माण केले ही बाब महत्वाची आहे.” श्री. चव्हाण आपल्या भाषणातून समकालीनांच्या कर्तृत्वच्या अचूक नोंद घेत असत. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, “अण्णांनी सामुदायिक शिक्षणाची चळवळ सुरु केली. त्यांनी निर्माण केलेल्या शाळा सामाजिक व सांस्कृतिक स्थित्यंतर घडवून आणणाऱ्या प्रयोगशाळा आहेत. श्री. यशवंतराव चव्हाण करंजवणे येथे धरणाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी धरणग्रस्तांच्या व्यथा अधोरेखित करताना ते म्हणाले, “प्रकल्पग्रस्तांचे दुःख मोठे आहे. पिढ्यान पिढ्यांच्या सहवासानंतर होणारा दुरावा बैचेन करणारा आहे.” आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उत्तम इंग्रजी बोलणारे यशवंतराव चव्हाण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी सॉक्रेटिसप्रमाणे प्रशोनोत्तर करीत संवाद साधत. ते शेतकऱ्यांच्या सभेत शेतकऱ्यांना प्रश्न विचारत. २७ उणे ९ किती होतात, बरेच जण १८ असे उत्तर देत. या उत्तराबद्दल ते म्हणत, ‘अरे बाबांनो शेतकऱ्यांच्या आयुष्यातील पावसाची ९ नक्षत्रे वजा केल्यावर फक्त शून्य उरते.’ स्वातंत्र्यपूर्व काळात तुरुंगात असताना ते चर्चासत्रे, बौद्धिके यात भाग घेत. त्यांनी तुरुंग हेच आपले विद्यापीठ होते, असे म्हटले आहे. ‘सह्याद्रीचे वारे’ आणि ‘युगांतर’ हे त्यांचे भाषण संग्रह प्रसिद्ध आहेत. आपल्या भाषणातून ते लोकशाही, समाजवाद, मानवता या मुल्याना महत्व देत. खुमासदार शैली आणि अभिजात आशय यांच्या माध्यमातून तत्वचिंतक यशवंतराव चव्हाणांची ओळख होत असे. समतोल, अभ्यासपूर्ण, वस्तुनिष्ठ विचार मांडणारे यशवंतराव चव्हाणांचे वक्तृत्व हे त्यांच्या नेतृत्वाचे प्रमुख साधन होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!