ताज्या घडामोडी

गुहागर प्राथमिक शिक्षक संघाचा गुणगौरव व सत्कार सोहळा उत्साहात

Spread the love

गुहागर  (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा तालुका गुहागरच्या वतीने सालाबादप्रमाणे गुणगौरव व सत्कार सोहळा पाटपन्हाळे येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष कैलास शार्दुल यांच्या अध्यक्षतेखाली सदर सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमप्रसंगी पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर तालुक्याच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी लीना भागवत , शिक्षण विस्तार अधिकारी गणपत पांचाळ , माजी शिक्षण विस्तार अधिकारी चिंतामणी गायकवाड, सौ.कदम,केंद्रीय प्रमुख अशोक गावणकर, नामदेव लोहकरे , विश्वास खर्डे, तुकाराम निवाते, पतपेढी संचालक सुनील रामाणे, कास्ट्राईबचे तालुकाध्यक्ष सुहास गायकवाड समितीचे तालुकाध्यक्ष अरविंद पालकर जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल धुमाळ दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष दशरथ कदम संघटनेचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तसेच शिक्षक बंधुभगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात गुहागर तालुक्यातील शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व विशेष पुरस्कार प्राप्त शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांचा सन्मान चिन्ह, शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिपक साबळे यांनी केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या गुणगौरव कार्यक्रमाचे कौतुक करत सदर सन्मान सोहळा हा शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले .
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी तर आभार दिपक रामाणे यांनी मानले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत झगडे सुनिल नार्वेकर,दिपक रेपाळ महेंद्र रेडेकर गितांजली जाधव शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिपक साबळे सचिव नंदकुमार पवार, कार्याध्यक्ष दिपक रामाणे, कोषाध्यक्ष ईश्वर हलगरे तालुका नेते भारत गायकवाड संपूर्ण तालुका कार्यकारणी, सदस्य व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!