ताज्या घडामोडी

Spread the love

रोटरी क्लब ऑफ जुहू मुंबई व फिनिक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रती वर्षां प्रमाणे याही वर्षी दिव्यांग व्यक्तींसाठी ‘कोरीगड ट्रेकिंग’ मोहिमेचे आयोजन केले गेले .ही मोहीम यशस्वी करण्यात अनेकांचे हातभार लागले आहेत. सर्व प्रथम या मोहिमेतील दिव्यांग साहसी वीरांचा सहभाग अत्यंत महत्वाचा होता.
कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आर्थिक बाजू खूप महत्वाची असते.2016 पासून रोटरी क्लब ऑफ मुंबई जुहू आनंदाने आपुलकीने करीत आहे.दिव्यांगाना ट्रेकिंग साठी निरोप देण्यास राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी आवर्जून आल्या होत्या.त्यांनी जुहू मध्ये दिव्यांगान साठी उत्तम गार्डन आणि जुहू चौपाटी येथे व्हील चेअर रॅम्प बनविण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ते पूर्णत्वास येईल अशी आशा व्यक्त करून उपस्थित दिव्यांग ट्रेकर्स ना निरोप दिला. या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ मुंबई जुहू, अध्यक्ष श्रीधर, सचिव अरुण व इतर सभासद उपस्थित होते.

रोटरी क्लब चे एक वरिष्ष्ट पदाधिकारी व फिनिक्स फाउंडेशन चे उपाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी आशिष पाटणकर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
मोहिमेचे आयोजन करताना अनेक गडांची पाहणी करण्यासाठी पायलट ट्रेक करणे, दिव्यांगांसाठी ट्रेकिंग योग्य अश्या ठिकाणाची निवड करणे, राहण्या – खाण्याची, बसेसची व्यवस्था करणे अनेक बारीक सारिक गोष्टींचा विचार आयोजना मध्ये केला जातो. या साठी फिनिक्स फाउंडशनचे अध्यक्ष संतोष संसारे व उपाध्यक्ष आशिष पाटणकर यांनी प्रचंड मेहनत घेतली.

लोणावळा येथील नॅशनल यूनियन ऑफ सीफेअर्स ऑफ इंडिया (NUSI) यांनी विनामूल्य भोजनाची, रहाण्याची अतिशय उत्तम सोय केली.

2008 फिनिक्स फाउंडेशन तर्फे पेठ किल्ला,रायगड, नाणेघाट, राजगड, राजमाची,रायरेश्वर,लोहगड,प्रतापगड, सागरगड ,कळसुबाई,भीमाशंकर, हडसर, ढाक बहिरी, प्रबळ माची,मुंबई किल्ले स्वच्छता मोहीम,अश्या अनेक ठिकाणच्या गड किल्ले ट्रेकिंग ..कब्बडी,बुध्दिबळ सारख्या स्पर्धांचे आयोजन केले आहे.

आता पर्यंत केलेल्या ट्रेक मध्ये ‘कोरीगड ‘ हा सर्वात सोपा असा ट्रेक होता. या ट्रेकचं वैशिष्ठ्य असं होतं की, या ट्रेक मध्ये जे दिव्यांग सहभागी झाले होते. त्यातील अनेक दिव्यांग व्यक्तींच्या अपंगत्वाचे प्रमाण खूपच जास्त होते. त्यामुळे त्यांना हा गड चढणे-उतरने कठीणच होते .
केवळ संतोष संसारे यांच्या मार्गदर्शनाने,दिव्यांग व्यक्तींची जिद्ध व इच्छाशक्ती मुळे व त्यांना मदत करणारे सहकारी, ट्रेकर्स, डॉक्टर्स, फिसिओ थेरपीस्ट्स ई. चे योगदान खूप महत्वाचे ठरले.डॉ.रवींद्रन व त्यांच्या फिजिओ टीमची खूप मदत झाली.

पडद्यामागे काम करणारे फिनिक्सचे नेहमीचे शिलेदार विनोद संसारे, उज्वला राणे व निखिल कोळी यांच्या मेहनतीला तोड नाही. दिव्यांगांची या मोहिमेसाठी निवड करून सतत त्यांच्याशी संपर्कात राहून त्यांना सहभागी करून घेण्यासाठी विनोद गुप्ता व राजन भरताव यांचे योगदान फार महत्वाचे होते.

संपूर्ण कार्यक्रमात ज्यांचा वावर आपणांस दिसत होता, अश्या व्यक्ती म्हणजे फोटोग्राफर व व्हिडीओ ग्राफर. त्यात विशेष करून उल्लेख करावाचा वाटतो तो तरुण ट्रेकर, फोटो ग्राफर कु.नेहा संसारे व व्हिडीओ ग्राफर भूषण संसारे या भाऊ – बहिणीचा. ट्रेकिंग मोहिमेचा प्रत्येक क्षण टिपण्यासाठीची त्यांची धडपड खूपच कौतुकास्पद होती.

कॅम्प फायरचे सूत्र संकलन विनोद रावत यांनी उत्तमरित्या केले. सर्व लहान मोठयांचा उत्स्फूर्त सहभाग या मुळे कॅम्प फायर ची रंगत वाढतच गेली. विनोद रावत व राजेश खंदारे या जेष्ठ दिव्यांग ट्रेकर्स यांनी आपल्या खडतर जीवनाच्या यशस्वी प्रवासाचे वर्णन केले व सर्व उपस्थित भारावून गेले.

ट्रेकिंगच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींमध्ये जिद्ध व आत्मविश्वास वृदिंगत करणे या साठी संतोष संसारे यांनी दिनेश पाटील,विनोद संसारे यांच्याशी विचार विनिमय करून 2001 पासून दिव्यांगांसाठी ट्रेकला सुरवात केली. त्याला 2008 साली फिनिक्स फाउंडेशन म्हणून मूर्त स्वरूप आले. त्यामुळे उद्धेश ट्रेक द्वारा सफल झाला असे म्हणता येईल.

कोरीगड ट्रेक 2022 या यशस्वी मोहिमेत 65 दिव्यांग व 26 मदतनीस यांनी सहभाग घेतला होता.गेल्या 15 वर्षात आता पर्यंत 2237 दिव्यांग सभासदांनी सहभाग घेतला आहे.शिवाय अशी माहिती मिळाली. संपूर्ण जगात एवढ्या मोठ्या संख्येने उत्तम नियोजन करून कोणीही दिव्यांगंसाठी ट्रेक चे आयोजन करीत नाहीत.
या उपक्रमात रोटरी चे दत्ता भागवत, दक्षा भागवत, मेहेक वाधवा मदतनीस म्हणून सामील झाले.

2022 च्या गिरीमित्र संमेलनात दिव्यांगांच्या राजगड या फिल्म ला उत्तेजनार्थ पारितोषिक देखील मिळाले.या आधी 2008 मध्ये रायगड फिल्म ला दुसरे पारितोषिक मिळाले होते.सर्वांचे धन्यवाद तसेंच ज्यांनी प्रत्यक्ष्य व अप्रत्यक्ष्य या मोहिमेत योगदान दिले त्या सर्वांचे फिनिक्स फाउंडेशन अत्यंत आभारी आहे.
धन्यवाद 

संतोष म.संसारे (9324247179)
अध्यक्ष (संस्थापक )
फिनिक्स फाउंडेशन ट्रेकिग फॉर फिसिकली चॅलेंज (s.m.sansare@gmail.com)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!