ताज्या घडामोडी

गुरुवारी नालंदा अभ्यास केंद्राच्या वर्धापनदिनी नुतन यशस्वीतांचा गौरव

Spread the love

कोकरुड/ प्रतापराव शिंदे
नालंदा मधुनी नव्या युगाचा माणूस घडतो आहे.वटवृक्षाच्या विशाल तेचा मोह नभाला पडतो आहे.असे ब्रीद वाक्य घेऊन गेली तेरा वर्षे मांगरुळ ता.शिराळा येथिल नालंदा अभ्यास केंद्र परिसरातील स्पर्धा परीक्षांसाठी बसणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या अभ्यास केंद्रातून आत्तापर्यंत एक पोलिस उपअधीक्षक, एक उपशिक्षणाधिकारी , पी.एस.आय, असिस्टंट मॅनेजर शिप्ला कंपनी यासह अनेक पोलिस,आमिॅ, नेव्ही,आय.टी क्षेत्रात काम करणारे युवक, युवतींना घडले आहेत. अशी गौरवशाली परंपरा असणाऱ्या नालंदा अभ्यास केंद्राचा १३ वा वर्धापनदिन गुरुवार दिनांक १ डीसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) च्या विक्रीकर निरीक्षक (एस.टी.आय) मुख्य परीक्षेत नम्रता ज्ञानदेव मस्के हिने मुलींच्या मध्ये राज्यात प्रथम क्रमांक तर मंत्रालय सहाय्यक म्हणून राज्यात आठवा क्रमांक आला.तसेच प्रसाद मारुती मस्के याची सशस्त्र सेना बल येथे निवड झालेबद्दल, सुशांत बबन मस्के याची सी आय एस एफ पदी निवड झाली या बद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती. नालंदा अभ्यास केंद्राचेे संस्थापक व लाचलुचपत प्रतिबंधक सिंधुदुर्ग विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे यांनी दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराला सर्वांनी उपस्थित रहावे

मांगरुळ परिसरातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांना स्पर्धा परीक्षांसह ईतर परिक्षासाठी एक चांगले शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध व्हावे. त्यांना यासाठी लागणारी पुस्तके व मार्गदर्शन मिळावे या हेतूने सन २००९ साली नालंदा अभ्यास क्रेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सध्या येथे मांगरुळसह परिसरातील अनेक विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी अभ्यास करत आहेत. यातील नुकताच स्पर्धा परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या नम्रता मस्के, सशस्त्र सेना बलामध्ये निवड झालेल्या प्रसाद मस्के व सी.आय.एस.एफ मध्ये सुशांत मस्के याची निवड झाल्या बद्दल
या विद्यार्थ्यांच्या सत्काराला गावातील प्रमुख पदाधिकारी, महीलावर्ग, युवक, युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नालंदा अभ्यास केंद्राचे व्यवस्थापक स्वप्निल मस्के यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!