ताज्या घडामोडी

ऊसाचा एफ.आर.पी. (FRP) एकरकमी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे अभिनंदन : सदाभाऊ खोत

Spread the love

आज ऊस दरा प्रश्नसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विविध शेतकरी संघटनेच्या सोबत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बैठक संपन्न झाली.

ऊसदर प्रश्नासंदर्भात राज्य सरकार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एक ते दीड तास सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर केंद्र सरकारच्या १९६६ च्या नुसार शेतकऱ्यांना ऊसाचा एफ.आर.पी. हा एकरकमी देण्यात येईल, असा निर्णय आजच्या बैठकीत राज्य शासनाने घेतला. त्या बद्दल रयत क्रांती संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले.

तसेच दोन कारखान्यांमधील असलेले २५ किलोमीटरचे हवाई अंतर देखील काढणे बाबत सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित मान्यवरांना आश्वासित केले.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, मंत्री दादा भुसे, रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत, रयतचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, शिवनाथ जाधव, सचिन नलवडे, शिवाजी माने व इतर संघटनेचे प्रतिनिधी आणि शासनाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!