ताज्या घडामोडी

चालक-मालक संघटनेच्या वतीने मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. ३० (प्रतिनिधी) : येथील खाजगी गाडीवरील चालक अनिल घोडके यांच्या मुलीच्या विवाहासाठी मुरूम शहरातील चालक-मालक संघटनेच्या वतीने १४,४५४ (चौदा हजार चारशे चोपण) रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. अनिल घोडके हे गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी गाडीवर चालक म्हणून काम करतात. घरची परिस्थिती जेमतेम असून त्यांना चार मुली व एक मुलगा आहे. त्या चार मुली पैकी पहिल्या मुलीच्या लग्नासाठी मुरूम शहरातील चालक-मालक संघटनेच्या वतीने पुढाकार घेऊन बुधवारी (ता. ३०) रोजी आर्थिक मदत केली. चालक-मालक संघटनेकडून वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मुलीच्या विवाहास आर्थिक मदत केल्याने मुरूम शहरातून चालक-मालक संघटनेचा कौतुक केले जात आहे. यावेळी चालक-मालक संघटना अध्यक्ष सतिश शेळके, जितेंद्र साठे, करबस भोसगे, अनिल ख्याडे, अर्जुन कांबळे, हैदर नुरसे, अविनाश झुरळे, गजेंद्र बंडगर, प्रदीप शेळके, गणेश देशमुख, ओमकार कुंभार, राजू साठे, भीमाशंकर बिराजदार,नितीन नागोबा, शिवा खुने, अजय साखरे आदींनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत केली. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील चालक-मालक संघटना अध्यक्ष सतिश शेळके, जितेंद्र साठे, करबस भोसगे, अनिल ख्याडे, अर्जुन कांबळे, हैदर नुरसे, अविनाश झुरळे, गजेंद्र बंडगर आदींनी अनिल घोडके यांच्या मुलीच्या विवाह आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!