ताज्या घडामोडी

आईच्या श्राद्धाच्या पैशांची कॅन्सरग्रस्तांना मदत

Spread the love

शिराळा प्रतिनिधी 

पन्हाळा तालुक्यातील माले येथील श्री.ज्ञानदेव महादेव पांगे यांनी आपल्या आईच्या श्राद्धाला येणार्या खर्चाचे पैसे “नो शेव्ह नोव्हेंबर कॅम्पेन फॉर कॅन्सर पेशंट्स” या आंतरराष्ट्रीय माहिमेचे आयोजक आणि वारणा कॅन्सर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांच्याकडे दिले.
श्री.ज्ञानदेव पांगे हे वारणानगर मधील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी मधे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.गेल्यावर्षी त्यांच्या आईचे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने निधन झाले.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने आईला ग्रासलं.कॅन्सरवरचे उपचार सुरु झाले.रेडिएशन आणि किमोथेरपी सुरु झाली.हळहळू कॅन्सरने संपूर्ण शरीर व्यापलं.आईच्या शारिरीक वेदना बघू वाटत नव्हत्या आणि वर्षभरापूर्वी आईने जगाचा निरोप घेतला.एखाद्या कुटुंबामधे कॅन्सर चा रुग्ण असेल तर होणारा प्रचंड आर्थिक खर्च आर्थिक दुर्बल कॅन्सरग्रस्त कसे करु शकतील य हा विचार करत असताना आपण या लोकांना मदत केली पाहिजे या विचारांनी वारणा कॅन्सर फौंडेशनच्या “नो शेव्ह नोव्हेंबर कॅम्पेन फॉर कॅन्सर पेशंट्स” या उपक्रमासाठी आईच्या श्राद्धाला येणार्या खर्चाचे पैसे दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!