ताज्या घडामोडी

यशवंत क्रांती संघटना मेंढपाळ बांधवांसाठी जीवनदायीनी

Spread the love

भारत व्हनमाने सांगली

यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजयजी वाघमोडे यांचे मुळे महाराष्ट्रातील अनेक मेंढपाळ बांधवांचे प्रश्न सुटताना दिसत आहेत. गेली अनेक वर्षे माननीय संजय वाघमोडे हे ग्राउंड लेव्हलला काम करीत आहेत व त्याच पद्धतीने मेंढपाळ बांधव ही त्यांना सहकार्य करीत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक एक्सीडेंट (अपघात) केसेस मध्ये त्यांनी समन्वयाची भूमिका घेऊन मेंढपाळ बांधवांना न्याय मिळविण्याचा विडा उचललेला आहे. कारण मेंढपाळ बांधव हा कायमच रस्त्यावर असणारा व आपल्या पायाची गाडी रोज चाळीस पन्नास किलोमीटर अंतर पार करणारा एक प्राणी मित्र आहे…त्याची गुजराण याच माध्यमातून होत असते…परंतु अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणाहून त्याच्यावर अनेक प्रसंग येत असतात काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती असते तर काही ठिकाणी शेतकरी बांधवांचा नुकसानाचा प्रश्न असतो तर बऱ्याचदा अनेक वाहनामुळे छोटे मोठे अपघात घडत असतात या सर्वांसोबत आपल्या मेंढ्यांना घेऊन मेंढपाळ कोकणातल्या दुर्गम भागातून मेंढरे चालण्यासाठी महाराष्ट्रातील सदन भागात येत असतो परंतु त्यांना येणाऱ्या अडचणी या वेगवेगळ्या पद्धतीचे असल्याने त्या सोडवण्यासाठी अनेकांची धडपड ही वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून चालू असते परंतु समन्वयाची भूमिका घेऊन मेंढपाळांना न्याय देण्यासाठी सरसावलेले संजयजी वाघमोडे मेंढपाळांच्या साठी जीवनदायींनी ठरत आहेत. अशा अनेक घटना मधील नुकतीच घडलेली घटना म्हणजे सांगली जिल्ह्यातील करोली टी ते योगेवाडीच्या मध्ये सोनालिका कंपनीच्या ट्रॅक्टरने एक मेंढपाळ बांधव 70 ते 80 पिल्ले घेऊन पुढे जात होता त्याच वेळेला नंबर नसलेला नुकताच कंपनीतून बाहेर काढलेला ट्रॅक्टर त्या पिल्लांच्या अंगावर जाऊ लागला परंतु काळाचा महिमा फार वेगळा असतो ते मेंढयाची पिल्ली वाचवण्याच्या नादात मेंढपाळ रोहित सुरेश हजारे वय 21 हा तरुण मेंढपाळ जखमी झाला पायाला फ्रॅक्चर झाले तेव्हा मेंढपाळ माळाप्पा जोंग यांनी तात्काळ यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय वाघमोडे यांना फोन वरून संपर्क साधून माहिती दिली संजयजी वाघमोडे यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत मेंढपाळाला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला त्यांनी यशवंत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय राहुल चौगुले व अहिल्यादेवी प्रबोधन मंच सांगली जिल्ह्याचे संघटक भारत व्हनमाने यांना फोन करीत सूचना दिल्या तोपर्यंत संस्थापक वाघमोडे साहेब यांनी कंपनीच्या मॅनेजर व कामगार लोकांना मेंढपाळांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी सांगितले सोनालिका कंपनीचे प्रवीण पवार ,दीपक पवार, नाना गोरे व प्रशांत पवार यांच्याशी बोलणे करून विश्रामबाग सांगली येथील आदित्य हॉस्पिटल येथे मेंढपाळ रोहित सुरेश हजारे यांना ऍडमिट करून योग्य ती कारवाई करण्यास सांगितले कंपनीने च्या लोकांनीही मेंढपाळांना योग्य ते सहकार्य करून समन्वयाची भूमिका घेतली. सर्व कंपनीने अशाच पद्धतीची भूमिका घेऊन जर सहकार्याची भूमिका घेतली तर कोणावरही अन्याय होण्याची वेळ येणार नाही. सोनालीका कंपनीने दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान घडलेल्या घटनेनंतर ते डिस्चार्ज होईपर्यंत सर्व खर्च पाहिला व सोबत त्यांना आर्थिक मदत म्हणून वीस हजार रुपये देऊ केले याबद्दल कंपनीचेही आभार मानावे लागतील. कारण एक्सीडेंट हा सांगून घडत नसतो वेळेनुसार सर्व घडत असते. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर सांगली मिरज कुपवाड नगरसेवक माननीय विष्णू माने यांनीही हॉस्पिटलच्या प्रशासनास योग्य त्या सूचना करून सहकार्य केले. यशवंत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष राहुल चौगुले यांनीही आपला अमूल्य वेळ देऊन यामध्ये मोलाची भूमिका राबवली. राहुल चौगुले कायमच सामाजिक कार्यात सक्रिय असतात व जेथे जेथे अन्याय होत असेल त्या ठिकाणी ते तात्काळ मदत करण्याची भूमिका घेतात. ते रोज हॉस्पिटलमध्ये येऊन मेंढपाळाची विचारपूस करीत होते जोपर्यंत डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत त्यांनी आपला मेंढपाळ हाच माझा समाज आहे व याचे मी देणे लागतो या भूमिकेतून कार्यमग्न असतात. यामध्ये कंपनीला ऑफिसर संतोष मदने साहेब यांनी सूचना करून मेंढपाळाला योग्य तो न्याय देण्याची कंपनीला सूचना केली त्या पद्धतीने कंपनीने सहकार्यही केले. दिनांक 25 नोव्हेंबर रोजी घडलेली घटना ही अतिशय वाईट असून यामध्ये मेंढपाळाचा जीव ही जाण्याची शक्यता होती त्यावेळी त्यांची आजी सोनाबाई धोंडी जोंग याही होत्या. परंतु अपघात हे मुद्दाम घडत नसतात ते काळानुसार घडत असतात. यशवंत क्रांती संघटनेचे संजयजी वाघमोडे यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे ते रोज एका मेंढपाळ बांधवांचे प्रश्न समन्वयाच्या भूमिकेतून सोडवत असतात. कारण मेंढपाळ हा कायम रस्त्यावर असणारा गरीब बांधव आहे त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावणे एवढा वेळ नाही कारण त्यांच्या सोबत असतात हजारो जीव त्यांचा त्या मेंढ्यामध्येच त्यांचा जीव अडकलेला असतो मग कोर्ट केस मध्ये जर हा बांधव अडकला तर कोर्टाच्या तारखा त्याला करणे शक्य होत नाही व धन दांडग्यापासून त्याला आपले संरक्षण करता येत नाही हे संजयजी वाघमोडे साहेबांनी अगदी परफेक्ट हेरून तात्काळ मदतीची योजना राबवण्याची भूमिका घेतली. संजयजी वाघमोडे प्रचंड कार्यरत असून त्यांना अशा प्रकारे ऊर्जा मिळो व त्यांचे कार्य मेंढपाळ बांधवापर्यंत पोहोचो व जास्तीत जास्त मेंढपाळ बांधवांना यशवंत क्रांती संघटनेच्या कार्याचा लाभ होवो हीच शिव अहिल्या चरणी प्रार्थना…
सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते व प्रतिष्ठित नागरिक यांनी समन्वयाची भूमिका घेतली तर हे पशुधन मेंढपाळाच्या माध्यमातून वाचू शकते व त्यांना संरक्षण देणे हे आपल्याही दृष्टीने महत्त्वाचे आहे हे आता माणुसकीच्या दृष्टिकोनातून लक्षात येत आहे हाच एक समाधानाचा पैलू आहे.यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय जी वाघमोडे यांचा संपर्क नंबर 94 0 50 73872

श्री.भारत व्हनमाने
सांगली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!