ताज्या घडामोडी

बारवडे विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

Spread the love

कै. रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालय, शिगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न,प्रज्ञासूर्य, क्रांतीसुर्य, महामानव, परमपूज्य ,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.प्रतापराव मधाळे (पापा) दलित मित्र पुरस्कार प्राप्त.शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. काशिलिंग गावडे, दैनिक लोकमतचे पत्रकार श्री. विनोद पाटील उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करख्यात आले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री.एस.के.माने यांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी मनोगतात बाबासाहेबांनी देशाच्या संविधानासाठी केलेल्या योगदानाची माहिती दिली, मुलानों शिका व मोठे व्हा हा संदेश दिला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय येडके यांनी बाबासाहेबांनी देशासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच क्रांतिसिंह माना पाटील यांनी प्रति सरकार या नावाने स्थापन केलेल्या शासनाचा आढवा सांगितला. तर दैनिक लोकमत चे पत्रकार श्री.विनोद पाटील यांनी शिगाव हे डॉ.बाबासाहेब आंबाडेकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव आहे. हि पुण्याई की पी. टी.मधाळे यांच्या मुळे बाबासाहेब आपल्या गावात आले.
विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. मीरा शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तालबद्ध गाण्याचे सादरीकरण केले.. यावेळी शिक्षक सौ.कुंभार मॅडम,सौ. चव्हाण मॅडम, सौ पाटील मॅडम, पवार मॅडम,श्री एस. ए. जाधव, अतुल पाटील, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये श्री.महेश कारंडे .श्री.अविनाश गुरव, श्री.बजरंग दळवी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीरा शिंदे यांनी केले. तर आभार क्रीडा शिक्षक श्री.अतुल पाटील यांनी मांडले. या कार्यक्रमाला मार्गदर्शन वाळवा शिक्षण संस्थेचे सचिव श्री.बी. एस. पाटील (आण्णा) व सहसचिव श्री.धैर्यशील पाटील (बाबा) यांचे लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!