आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पवनानगर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन पर शिबिराचे आयोजन!! 

  १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी, व पालकांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.. प्राचार्या अंजली दौंडे

Spread the love

पवनानगर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन पर शिबिराचे आयोजन ll

आवाज न्यूज पवना नगर: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व पवना शिक्षण संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पवना विद्या मंदिर येथे मावळ तालुका व पवनमावळातील विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पवनानगर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे यांनी दिली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना दहावी नंतर पुढे काय ? असा प्रश्न कायम पडतो त्यामुळे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे यांनी पुणे येथील न्यू समर्थ स्मार्ट स्कूलींग यांच्या प्रयत्नातून हे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात विज्ञान, वाणिज्य व कला या तिन्ही शाखांमधील शिक्षणाचे महत्त्व व त्यातून जीवनाला मिळणाऱ्या पुढील दिशा या विषयांवरती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते व न्यू समर्थ स्मार्ट स्कूलींगचे कार्यकारी संचालक प्राध्यापक संजय देशमुख व प्राध्यापक सुरेश पांडे हे मार्गदर्शन करणार आहे

मावळ तालुक्यातील तसेच पवनमावळ परिसरातील  १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी  व पालकांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी शाळेच्या प्राचार्या अंजली दौंडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!