ताज्या घडामोडी
वाकुर्डे बुद्रुक येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस बैठक संपन्न.
शिराळा प्रतिनिधी / वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथे महिन्याच्या पहिल्या शनिवारी ”एक तास राष्ट्रवादीसाठी” या उपक्रमाअंतर्गत बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक होते. बैठकीत पक्षसंघटन, पक्षविस्तार, नागरिकांच्या समस्या, विकास कामे आदींबाबत चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष मा. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती हिंदुराव बसरे सर, विश्वास कारखान्याचे माजी संचालक भीमराव पाटील, डॉ अजय पाटील, रमेश माने यांच्या सह नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.