ताज्या घडामोडी

डोंबिवलीच्या कवयित्री हिरकणी राजश्री बोहरा व सौ. अनिता गुजर यांचा साहित्य संपदा भूषण गौरव पुरस्काराने सन्मान

Spread the love

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तसेच कवयित्री शांता शेळके यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त साहित्य संपदा तर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध कवयित्री हिरकणी राजश्री बोहरा व सौ. अनिता गुजर यांना सर्वोच्च असा साहित्य संपदा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
साहित्य क्षेत्रात राबवत असलेल्या विविध उपक्रम व मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांचे विशेष उल्लेखनीय योगदान याची दखल घेऊन हा सन्मान त्यांना देण्यात आला आहे.
या कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक गीतकार प्रवीण दवणे ,कवी गीतकार राजन लाखे अध्यक्ष म.सा . प पिंपरी चिंचवड शाखा ,साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे ,हेमंत नेहते अध्यक्ष आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक व साहित्य क्षेत्रातील अनेक समूहातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!