आरोग्य व शिक्षण

बजरंग दलाच्या माध्यमातून डोंगर वाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

शिबिरात 175 जणांची करण्यात आली तपासणी

Spread the love

वडेश्वर : वडेश्वर येथील डोंगरवाडी या आदिवासी वाडीवर अजित गौतम तांबे यांच्या समरणार्थ व Fitness 365 club यांच्या संयुक्त विद्यमाने, विश्व हिंदु परिषद बजरंग दल आयोजित मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले .

अंदर मावळातील दुर्गम भागात वाहतुकीच्या अपुऱ्या सोई सुविधां मुळे आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत , लहान मुलं, महिला , वयस्कर मंडळी यांना आजार पणात दूर जाता येत नाही त्या मुळे बरेचदा आजार अंगार काढला जातो नंतर त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. आशा दुर्गम भागात आरोग्याच्या समस्या असतांना आरोग्य कॅम्प म्हणजे येथील नागरिकांसाठी देव दूतच असतो येथील तरुण- मारुती हिले यांनी सांगितले.

येथील लहान मुलांचे वजन हे कमी भरत असून महिलांचे वजन ही कमी भरत आहे महिलां मधे रक्ताचे व कॅल्शियम चे प्रमाण कमी आहे असे तपासणी अंती लक्षात आले .

ह्या आरोग्य शिबिरात डॉ रविकिरण अनुसे यांनी कॅल्शिअम व रक्त वाढ या विषयी उदभवणार्या समस्यांवर आहारा संदर्भात आरोग्यवर मार्गदर्शन केलं

या दुर्गम भागात आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर असून या संदर्भातील गांभीर्य लक्षात घेता पुढील काळात बजरंग दल प्रत्येक वाडी वस्तीवर आरोग्य शिबीर घेणार आहे असे बजरंग दल प्रखंड मंत्री सुशील वाडेकर यांनी सांगितले.

आरोग्य शिबिरात महिला ,लहान मूल, तरुण, वयस्कर अश्या 175 जणांची तपासणी करून औषधे देण्यात आली. लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

या वेळी श्रीमती ज्योती अजित तांबे , अर्जुन बोराटे, फिटनेस क्लब चे योगेश दळवी, डॉ रविकिरण अनुसे, डॉ विश्वजित गारगोटे , सचिन वाघमारे, बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे, प्रा बाळासाहेब खांडभोर, महेंद्र असवले, सुशील वाडेकर, भरत शिंदे, सचिन खांडभोर , अंगण वाडी सेविका कविता मोरमारे,भास्कर गोलिया, निखिल भांगरे, रोहिदास ढाकोळ,राजु टिकडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!