ताज्या घडामोडी

नगरपंचायत च्या इतिहासात प्रथमच पार पडले कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी /
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा देशभरात मोठ्या उत्साहाने व देशाप्रतीच्या सार्थ अभिमानाने साजरा होत आहे. आज दि. 14/08/2022 रोजीचे ध्वजारोहण सोहळ्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्ये म्हणजे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.योगेश बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या कार्यालयातील प्रदीर्घकाळ सेवा बजाविणारे व प्रत्येक ध्वजारोहण सोहळ्यावेळी ध्वजाच्या सन्मानाची संपूर्ण जबाबदारी घेवून ते तेवढ्याच निष्ठेने प्रत्येकवेळी निभावणारे कार्यालयीन कर्मचारी श्री. सदानंद नामदेव टिळे यांना आजच्या कार्यालयाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा मान देत त्यांनी आज अखेर केलेल्या सेवेचा व राष्ट्रध्वजाच्या तसेच राष्ट्राप्रतीच्या अत्यंत मौल्यवान कार्याचा सन्मान केला. प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या या अकल्पित व कौतुकास्पद कल्पनेमुळे कार्यालयीन कर्मचा-याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता… यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी , नागरीक उपस्थित होते…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!