ताज्या घडामोडी

मोहोळला आजपासून पुरुष व महिलाच्या राज्य निमंत्रित खो खो स्पर्धा

Spread the love

निमित्त : खो-खो दीन आणि या खेळाचे आधारस्तंभ खासदार शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस*

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

सोलापूर, खो-खो खेळाचे आधारस्तंभ खासदार शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर आहे. हा दिवस खो खो दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त मोहोळ येथे १२ ते १५ डिसेंबर २०२२ दरम्यान पुरुष व महिला गटाच्या राज्य निमंत्रित खो खो स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा स्पर्धा अध्यक्ष यशवंत माने व स्पर्धा कार्याध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी दिली.

स्पर्धेसंबंधी आधिक माहिती सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि सोलापूर अॅम्युचर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने व न्यू स्पोर्ट्स अकॅडमी संचलित न्यू सोलापूर खो खो क्लबच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत राज्यातील १६ पुरुष व ८ महिला संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा नागनाथ विद्यालय मोहोळ येथील लोकनेते कै. बाबुराव अण्णा पाटील अनगरकर या क्रीडा नगरीत होईल. या स्पर्धेतील प्रवेशद्वारास न्यू सोलापूर खो खो क्लबचे खेळाडू कै. विजयराव मुळीक व कै. राजू हिरापुरे यांची नावे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी दोन मैदाने तयार करण्यात आली असून दोन्ही मैदानावर विद्युतझोताची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षकांना या स्पर्धेतील सामन्यांचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली आहे. खेळाडूंना दररोज प्रोटीन युक्त आहार देण्यात येणार आहे. स्पर्धेतील खेळाडूंची निवास व्यवस्था सामाजिक न्याय विभाग महिला वसतिगृहात करण्यात आली आहे.
——–
*न्यू सोलापूर खो खो क्लबचे परिश्रम*

स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्पर्धा सचिव संतोष कदम, न्यू सोलापूर खो खो क्लबचे अध्यक्ष मनोज संगावार, प्रिया पवार, सुरेश भोसले, रमेश बसाटे, गोकुळ कांबळे, गुलाब मुजावर, युसूफ शेख, आनंद जगताप, प्रथमेश हिरापुरे व रवी मैनावाले आणि त्यांचे सर्व पदाधिकारी व खेळाडू परिश्रम घेत आहेत.
——-
*अदिती तटकरे, रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन*

या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री अदिती तटकरे आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि.१२) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी बळीराम साठे, राजन पाटील, महेश कोठे, दिलीप कोल्हे व विक्रांत पाटील या मान्यवरासह भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, राज्य खो खो संघटनेचे उपाध्यक्ष महेश गादेकर, सचिव गोविंद शर्मा आदी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय आणि सर्वोत्कृष्ट अष्टपैलू, संरक्षक व आक्रमक खेळाडूस रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल.

——-
*स्पर्धेची गटवार विभागणी :*
पुरुष : अ गट : शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स (मुंबई उपनगर), अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ (वेळापूर, सोलापूर), छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ (उस्मानाबाद), साखरवाडी क्रीडा मंडळ (सातारा).

ब गट : विहंग क्रीडा मंडळ (ठाणे), सरस्वती स्पोर्ट्स क्लब (मुंबई), एकलव्य क्रीडा मंडळ (अहमदनगर), किरण स्पोर्ट्स क्लब (सोलापूर).

क गट : नव महाराष्ट्र संघ (पुणे), राणाप्रताप तरुण मंडळ (कुपवाड, सांगली), विद्यार्थी क्रीडा केंद्र (मुंबई), शिवप्रतिष्ठान खो खो क्लब (मंगळवेढा, सोलापूर).

ड गट : लोटस स्पोर्टस क्लब (सांगली), श्री सह्याद्री संघ (मुंबई उपनगर), उत्कर्ष क्रीडा मंडळ (सोलापूर), शेवगाव स्पोर्ट्स क्लब (शेवगाव, अहमदनगर).

महिला : अ गट : रा.फ. नाईक महिला खो खो संघ (ठाणे), आर्यन स्पोर्ट्स क्लब (रत्नागिरी), संस्कृती क्लब (नाशिक), साखरवाडी क्रीडा मंडळ (सातारा).

ब गट : राजमाता जिजाऊ संघ (पुणे), छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ (उस्मानाबाद), नरसिंह क्रीडा मंडळ (पुणे) कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब (वाडीकुरोली, सोलापूर).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!