ताज्या घडामोडी

शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त कन्या हायस्कूल मलकापूर येथे ८२ रंगीबेरंगी आकर्षक पाणी बाटल्या आणि चित्रांचे अनोखे प्रदर्शन….

Spread the love

धीरोदात्त वृत्ती, मुत्सद्दीपणा अन्‌ दूरदृष्टी या व्यक्तीमत्त्व गुणांच्या जोरावर राजकारण आणि समाजकरणाच्या माध्यमातून केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर शरद पवार यांनी आपला ठसा उमटवला असून त्यांच्या रुपाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशाने एक उत्तम क्रीडाप्रेमी, आधुनिक नेता अनुभवला आहे. एवढेच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा यांच्या विचारांचा आणि शैक्षणिक कार्याचा वारसा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार हे सक्षमपणे पुढे घेऊन जात आहेत. त्यांची या शिक्षण संस्थेतील ५० वर्षांची यशस्वी सुवर्णमहोत्सवी वाटचाल… यानिमित्ताने संस्थेतील शाखापातळीवर त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून दिनांक ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबवून कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स, मलकापूर या विद्यालयात कला विभागाच्या वतीने चित्रकला स्पर्धे बरोबरच शरद पवार यांचा ८२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धे बरोबरच विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ५० चित्रकृतींचे आणि वेगवेगळ्या डिझाईन,आकारांच्या, रंगीबेरंगी आकर्षक ८२ पाणी बाटल्यांचे अनोखे प्रदर्शन कलाशिक्षक अशोक जाधव यांच्या संकल्पनेतून भरविण्यात आले.त्याला विद्यार्थ्यांनी आणि सेवकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन मनमुराद आनंद लुटला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!