ताज्या घडामोडी
चिखली येथे पृथ्वीराज या दुकानाचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
शिराळा प्रतिनिधी : चिखली (ता. शिराळा) येथील सचिन साळुंखे यांनी शिराळा येथे सुरू केलेल्या पृथ्वीराज या दुचाकी गाड्यांचे स्पेअर पार्टस् दुकानाचे फित कापून उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. यावेळी माजी सभापती सम्राटसिंग नाईक,विश्वासचे संचालक विश्वास कदम, ॲड. अक्षय कदम, रवि यादव, श्रीरंग साळुंखे, अभिजित साळुंखे, बाबासो साळुंखे, जे. बी. साळुंखे, संदिप साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.