आरोग्य व शिक्षण

देवलेतील विलास आंबेकर यांचे अपघातात निधन

Spread the love

लोणावळा : देवले गावातील युवक कार्यकर्ते , प्रगतीशील शेतकरी विलास विष्णू आंबेकर (वय-५१) यांचे नुकतेच मळवली परिसरात मुंबई पुणे द्रूतगतीमार्गावर अज्ञात वाहनाने जोरात धडक देवून गंभीर जखमी केल्याने जागीच निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी , दोन मुलगे , एक विवाहित मुलगी , दोन बाऊ , दोन बहिणी असा परिवार आहे. गुढीपाडव्याचे दुसऱ्या दिवशी ता.३ रोजी सायंकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली.

लोणावळा ग्रामिण पोलिसांना महामार्गावर असलेल्या पोलिसांकडून माहिती समजल्यावर लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक प्रविण मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला. देवलेतील तीस चाळीस वर्षे प्रसिद्ध गाडामालक व फायनलसम्राट असलेले कै.विष्णू आंबेकर यांचे ते सुपुञ होत. तसेच माजी सरपंच एकनाथ दत्तू आंबेकर आणि बबन आंबेकर हे त्यांचे चुलत भाऊ तसेच युवक कार्यकर्ते संतोष विष्णू आंबेकर हे त्यांचे धाकटे बंधू , सरपंच महेंद्र आंबेकर हे निकटचे नातेवाईक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!