ताज्या घडामोडी

विश्वास ‘ सेवक पतसंस्था अध्यक्षपदी विश्वास कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील

Spread the love

शिराळा प्रतिनिधी : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास सेवकांची पतसंस्था मर्यादित यशवंतनगर-चिखलीच्या अध्यक्षपदी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल अशोकराव पाटील यांची तर, उपाध्यक्षपदी विश्वास कारखाना व्यवस्थापक दिपक रंगराव पाटील यांची निवड बिनविरोध झाली. सदर निवडी सहकारी संस्थांचे सहाय्यक उप निबंधक डी. एस. खताळ यांनी जाहिर केल्या. संस्थेची पंचवार्षीक निवडणूक नोव्हेंबर 2022 मध्ये बिनविरोध झाली.
अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाली. निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांचा अभिनंदनाचा ठराव. विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे सचिव सचिन पाटील यांनी मांडला. त्यास संचालक मंडळाच्या वतीने दिनकर महिंद यांनी अनुमोदन दिले. सहाय्यक उप निबंधक श्री. खताळ यांच्या हस्ते नुतन अध्यक्ष अमोल पाटील व उपाध्यक्ष दिपक पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कर केला.
नुतन अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील व संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली कारखान्यासह विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पाचें कामकाज सुरळीत व अर्थिक मापदंड पाळत नेटकेपणाने सुरू आहे. त्याच प्रमाणे कामगार पतसंस्थेचे कामकाज नेटके व कामगार हिताचे कारण्याचा प्रयत्न राहील. कामगारांना कर्जपुरवठा करणे, कर्ज वसूली, माफक व्याज दर, ठेवी मिळविणे, लाभांष आदींचे काटेकोरपणे व्यवस्थापन ठेवण्याचा प्रयत्न करून संस्था प्रगतीपथवर नेण्यासाठी माझ्यासह सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील राहील.
प्रारंभी संस्थेचे सचिव संजय चरापले यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी विश्वासराव साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, संचालक सर्वश्री. राजेंद्र शामराव पाटील, संजय धोंडीराम नाईक, पोपट सदाशिव पाटील, संदिप सुभाष पाटील, गजानन बाबुराव पाटील, संजय तुकाराम पाटील, अरविंद कृष्णा पाटील, सुरेश गणपती कांबळे, महेश पांडुरंग कुंभार, मुबारक हुसेन नायकवडी यांच्यासह कारखान्यातील सर्व खातेप्रमुख, पतसंस्थेचे बाबासो साळुंखे आदी उपस्थित होते. सुरेश वाघ यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!