अध्यात्मिकमावळसामाजिक

गणेशोत्सव आठ नऊ दिवासांवर येऊन ठेपल्याने गणेशमुर्ती स्टाॕलवर मुर्ती बुकींग साठी गर्दी होताना दिसते.

मुर्तीच्या किंमती सुमारे १० ते ३० टक्क्यांनी वाढ.

Spread the love

गणेशोत्सव आठ नऊ दिवासांवर येऊन ठेपल्याने गणेशमुर्ती स्टाॕलवर मुर्ती बुकींग साठी गर्दी होताना दिसते ; मुर्तीच्या किंमती सुमारे १० ते ३० टक्क्यांनी वाढ.

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १० सप्टेंबर‌.

गणेशोत्सव चवदा दिवासावर येऊन ठेपल्याने गणेशमुर्ती स्टाॕलवर मुर्ती बुकींग साठी गर्दी होताना दिसून येत आहे. काही दुकानदारांनी गणेशमुर्तीला डायमंड लावून मुर्तीला सुरेख आकार व रूप देण्याचे काम चालू आहे.
मळवली व लोणावळा येथील विविध गणेशमुर्ती स्टाॕलवर गणपतीचे मुर्तींची मांडणी, रंग, किंमती याबाबत आढावा घेताना मुर्तींची किंमत सुमारे १० ते ३० टक्के वाढताना दिसत आहे.

लोणावळा बाजारपेठ , जुनाबाजार येथे असलेल्या श्री प्रथमेश गणेशमुर्ती कला केंद्राला भेट दिली असता , याचे मालक कै.ज्ञानेश्वर कंधारे यांनी ६५ वर्षापूर्वी सुरू केलेल्या या कला केंद्रात दत्त अवतारातील , बालाजी रूपामधे , जय मल्हार रूपामधे , श्रीमंत दगडूशेठ गणपती , टिटवाळा , अंबुजा , शाडूमातीतील आसनमांडी , शिवपिंडीवरील बालगणेश मुर्ती विक्रीसाठी पहायला मिळते. येथे पीओपी मधील गणेशमीर्तीही विक्रीला आहेत.एक फूट ते तीन फूट गणेशमुर्ती तसेच गौरीचे मुखवटे व अखंड बाॕडी पीओपीमधे विक्रिसाठी येथे आहेत.

मालक सचिन कंधारे यांना त्यांची बहीण.रेखा कंधारे, अक्षय कुडले, अभिजित कुडले हे मदत करतात. दरवर्षी सुमारे ३०० ते ४०० गणेशमुर्तींची विक्री केली जाते, गाडीभाडे वाढले , पेट्रोल , डिझेल वाढल्यामुळे किमती ३०% वाढल्या आहेत , असे श्री.कंधारे यांनी सांगितले.

 

मळवलीत एक गणपती मुर्ती विक्रेते श्री गणेश कला केंद्राचे मालक विकी गायकवाड हे गेली पंचवीस वर्षे पेनवरून गणेशमुर्ती आणतात. तसेच ग्राहकांनी सांगितल्यावर मुर्तींला डायमंड , व आकर्षक दागिने लावून देतात..
श्रीमंत दगडूशेठ हलवाई , लालबागचा राजा , टिटवाळा , मोरावरील, कमळावरील तसेच शंकर पार्वतीसह गणपती विक्रीसाठी उपलब्ध आहेत,  ग्राहकांच्यावतीने सांगण्यात आले, तर त्यासाठी गणेशमुर्ती अधिक आकर्षक रूपात दिसावी , म्हणून तिला डायमंड , रंगीबेरंगी खडे , ज्वेलरी लावण्यात येते, असे विकी गायकवाड म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!