ताज्या घडामोडी

राहुरी कृषी विद्यापीठाची संशोधन वाटचाल अभिनंदन- डॉ ढगे

Spread the love

राहुरी विद्यापीठ (प्रतिनिधी)महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार यांना राज्य पातळीवरचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांचा सन्मान प्राचार्य डॉक्टर अशोकराव ढगे व सरपंच विठ्ठल राव परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला
या  प्रसंगी वक्तव्य करताना डॉ.ढगे म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त महत्त्वाचे संशोधन केले जाते आतापर्यंत केलेल्या संशोधनाने कृषी उत्पादनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे विविध पिकांचे उत्पादन वाढले आहे याचे श्रेयकृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना आहे भारतीय पातळीवरील प्रथम ग्रेडचे संशोधन या विद्यापीठात केली गेले व यापुढील दिशा व त्याची वाटचाल आज आमच्यासारख्यांना आनंदाची व अभिमानाची आहे
डॉगोरंटीवार हे हाडाचे संशोधक आहेत त्यांनी अत्यंत संशोधनात परिश्रम घेतले आहेत त्यांना योग्य न्याय मिळाला असून या पुढील काळात त्यांना मिळालेल्या संधीचा ते सोने करतील असा विश्वास डॉढगे यांनी व्यक्त केला सरपंच विठ्ठलराव परदेशी यांनी संशोधन संचालकांचे अभिनंदन केले याप्रसंगी माजीज्येष्ठ कृषी विद्या वेता डॉक्टर एस पवार हजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!