ताज्या घडामोडी

सांगली येथे महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य व्याख्यानमालेचे आयोजन

Spread the love

सांगली येथे महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य अशी व्याख्यानमाला आयोजित केली असून या व्याख्यानाचे व्याख्याते प्राध्यापक संतोष पिंगळे सर हे असून त्यांनी सरंजामे मरहट्टे हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यामध्ये व्याख्याते म्हणून प्रशांत बबनराव लवटे पाटील हेही लाभले असून या कार्यक्रमासाठी होळकराचे वंशज श्रीमंत भूषण सिंह होळकर हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीता ताई खोत उपस्थित असणार आहेत. व्याख्यानाचा कार्यक्रम दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता होणार असून या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व इतिहास प्रेमींनी व युवक मित्राने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सांगली यांचे वतीने करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार असून मराठे शाही चा जाज्वल्य इतिहास यासह सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महाराष्ट्र मधील सर्वात सुंदर स्मारक पाहण्याचा योग आलेला आहे तरी सर्व युवक मित्रांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजता उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!