ताज्या घडामोडी

पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटी संचालित मराठी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग, इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ नुकताच विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने पार पडले.

या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी प्रमुख अतिथी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील, आर्यन एज्युकेशन सोसायटी कार्यकारिणी पेट्रोन असोसिएट सदस्य केदार काळे, उपेंद्र घरत, मुख्याध्यापक जगन घरत, स्नेहा सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.

स्नेहसंमेलनाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मार्च २०२२ च्या एस. एस. सी. परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्यागुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

स्नेहसंमेलनामध्ये भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, एकांकिका, फॅशन शो अशा विविध कला सादर केल्या. देशातील विविध पारंपरिक संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून घडवले. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!