ताज्या घडामोडी

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांचे राज्य पातळीवर यश – रणधीर नाईक.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
शिराळा विधानसभा मतदारसंघातील माणिकवाडी ता. वाळवा येथील अक्षय अधिकराव कोरे यांनी एमपीएससी परीक्षेत राज्य कर निरीक्षक म्हणून यश संपादित केले त्याबद्दल सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यशवंत युवक संघटनेचे अध्यक्ष सत्यजित नाईक, अभिजित नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रणधीर नाईक म्हणाले, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम या जोरावर एका सर्वसामान्य शेतमजूर कुटुंबातील मुलगा राज्य कर निरीक्षक होतो ही बाब त्याचे कुटुंब, समाज व युवा पिढीच्या दृष्टीने आदर्शवत आहे. भागातील मुले एमपीएससी व यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमधून यशस्वी होत आहेत. याची टक्केवारी भविष्यात वाढली पाहिजे. हुशार, सुज्ञ व मातीशी नाळ असणारे युवक युवती अशा स्पर्धा परीक्षांमधून सातत्याने यशस्वी झाले पाहिजेत.
कार्यक्रमास अधिकराव कोरे, यशवंत ग्लुकोज कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, संचालक बी. आर. पाटील, बंडा डांगे, अशोक आटुगडे, रघुनाथ पाटील, आनंदराव पाटील, भोला पाटील, प्रकाश पाटील, अनिल शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!