ताज्या घडामोडी

जाणता राजा फाऊंडेशन तर्फे पास्थळ येथे पास्थळ महोत्सव उत्साहात संपन्न

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
पास्थळ येथील युवा समूह जाणता राजा फाऊंडेशन दोन दिवसीय पास्थळ महोत्सव आंबट गोड मैदानावर मोठ्या उत्साहाने पार पडला.

या महोत्सवामध्ये पालघर जिल्हयाचे खासदार राजेंद्र गावित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष विदुर पाटील होते.

दोन दिवसीय आनंद महोत्सवात बाल आनंदोत्सव, तारपा नृत्य प्रदर्शन, राॅकर्झ म्युझिकल शो, मॅजिक शो, स्पॉट गेम्स, लकी ड्रॉ सोडत, सेल्फी पॉईंट अन महत्त्वाचे आकर्षण म्हणजे वसईकर रिदम बॅन्डसची संगीत मैफील यासह विविध ६५ स्टॉल्स धारकांनी आपल्या उपस्थितीने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. परिसरातील रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

एक हात मदतीचा या उपक्रमातुन पुढे राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती जाणता राजा फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश घरत यांनी प्रास्ताविकेतुन दिली. जाणता राजा फाउंडेशनचे सचिव हितेश राऊत यांच्या विविधांगी संकल्पनेतुन व सर्व सदस्यांच्या मेहनतीने महोत्सव संपन्न झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमश्री घरत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!