क्रीडा व मनोरंजन

महाराष्ट्र राज्य आलिंम्पिक क्रीडा स्पर्धा

Spread the love

महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आलिंम्पिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध ठिकाणी महाराष्ट्र राज्य आलिंम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.

“महाराष्ट्र राज्य आलिंम्पिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन दि.०२ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत ३९ क्रीडा प्रकारांमध्ये, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये बारामती.ए एम आय घोरपडी व पुना क्लब येथे आयोजन करण्यात येणार आहेत तसेच राज्यातील नाशिक, नागपूर, जळगांव, मुंबई, अमरावती व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये देखील क्रीडा स्पर्धा संपन्न होणार आहेत.

“महाराष्ट्र राज्य आलिंम्पिक क्रीडा स्पर्धा” अंतर्गत मुंबई शहर येथे दिनांक ४ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये इंडियन जिमखाना, माटूंगा व डान बास्को स्कूल, किंग्ज सर्कल, माटुंगा येथे बास्केटबाॅल खेळाची स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले आहे. तसेच याॅटिंग खेळाचे आयोजन दि. १० ते १४ जानेवारी २०२२ या कालावधीत गिरगांव चौपाटी, मुंबई येथे निश्चित केले आहे.

सदर स्पर्धेच्या उदघाट्न पुर्वी मुंबई शहर जिल्ह्यातून क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० वा गेट वे आफ इंडीया येथून मा. जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांचे शुभ हस्ते दिप प्रज्वलीत करुन रॅलीस सुरवात होणार आहे.

सदर क्रीडा ज्योत रॅलीमध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील नावाजलेले व क्रीडा पुरस्कारार्थी प्राप्त खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच एन.सी.सी कॅडेट्स, आर्मी याटिंग नोडचे खेळाडू/अधिकारी, नेहरु युवा केंद्राचे खेळाडू, विविध शाळेतील उभरते खेळाडू असे जवळपास ५०० खेळाडू/अधिकारी यांचा सहभाग असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!