मावळसामाजिक

लोणावळा औंढेखुर्द मार्गे पवनानगर मार्गावर भैरवनाथनगर , कुसगाववाडी हद्दीतील काही भाग सोडल्याने वाहनचालक ञस्त.

Spread the love

लोणावळा औंढेखुर्द मार्गे पवनानगर मार्गावर भैरवनाथनगर , कुसगाववाडी हद्दीतील काही भाग सोडल्याने वाहनचालक ञस्त.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी ३० सप्टेंबर. 

लोणावळा औंढेखुर्द मार्गे पवनानगर मार्गावर भैरवनाथनगर , कुसगाववाडी हद्दीतील काही भाग सोडल्याने वाहनचालक ञस्त झाले आहेत. वाहनचालक यांना येथे खड्ड्यांमुळे मणक्याचा ञास व शारिरिक व्याधींचा सामना करावा लागतो , त्यामुळे या रस्त्याचे निकृष्ट कामाची सखोल चौकशीची मागणी काही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांकडून या रस्त्यावर वारंवार वाहनांना अपघात होत असल्याने दुग्धव्यवसायिक , कामगारवर्ग , कामाला , बाजारहाटाला जाणाऱ्या महिला व पुरूषांना याचा प्रचंड ञास होत आहे.

या रस्त्याचे आॕडिट करून काम काही ठिकाणी का सोडले आहे , त्याठिकाणी काम काँक्रीटीकरण करण्यात आले नाही , याबाबत तातडीने चौकशीची काही औंढेखुर्द , औंढोली , दुधिवरे , कुसगाव बुद्रूक , देवले , भाजे , डोँगरगाववाडी ग्रामस्थांतर्फे मागणी करण्यात आली आहे. भाजेचे माजी उपसरपंच अशोक दळवी , माजी सरपंच नंदकुमार पदमुले , माजी सरपंच वाघू दळवी , औंढेखुर्द चे माजी उपसरपंच निलेश नाणेकर , औढे विकास सोसायटी चे माजी व्हाईस चेअरमन सुरेशभाऊ आंबेकर , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ यांनी ही रस्त्याची कामे का अर्धवट सोडली , जेणेकरून नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागत आहे.असा प्रश्न उपस्थित केला आहे. औंढोली चे माजी ग्रामपंचायत सदस्य आनिल केदारी , तसेच डोंगरगाव चे ग्रामस्थ यांनी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!