ताज्या घडामोडी

इस्लामपूर येथे विद्यालंकार बहूउदेशी सेवाभावी संस्था इस्लामपूर यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती

Spread the love

इस्लामपूर तालुका वाळवा येथे. विद्यालंकार बहूउदेशी सेवाभावी संस्था इस्लामपूर यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 18 सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा इतर क्षेत्रातील महिला ना विद्यालंकार, सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव विध्या पाटील यांनी केले तर उपस्थिताचे स्वागत दिलीप पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती दीपा विवेक देशपांडे या होत्या यांच्या हस्ते अस्मिता कुलकर्णी, सौ, मंगल कनप , सौ, कल्पना कुंभार सौ स्नेहा जाधव , सौ पिसाळ म्याडम , सौ विलभा पाटील सौ कल्पना लोहार सौ माधुरी पाटील , सौ स्नेहा जाधव सौ सौ माने म्याडम , सौ करूना बिरजे सौ छाया निकम सौ स्वाती पाटील सौ अलका कदम सौ पुष्पा सुर्यगंध सौ रुतूजा पाटील सौ सुलभा निकम सौ वैशाली नरूले सौ स्वाती जगताप कुमारी. शिवानी पाटील सौ उज्वला पाटील व इतर उपस्थित मान्यवरांची या प्रसंगी सत्कार करण्यात आला …… अध्यक्ष पदावरून बोलताना दिपा देशपांडे म्हणाल्या की. पूर्वी च्या काळात चूल आणि मुल हेच काम होत पण भारतीय संविधानामुळे आज स्त्री स्वावलंबी बनून नोकरी करत आहे .जर एखाद्या स्त्री चा पती वारला तर ती विधवा म्हणून बाजूला राहत होती पण आजच्या युगात तिला हळदी कुंकू चा मान मिळू लागला जोखडातून मुक्त होऊन आज ती मानाने खूपच आनंदी जीवन जगू लागली आहे तरी हि कायद्या मध्ये कडक तरतुदी करून नरधमाना वचक बसविली पाहिजे तर अन्याय अत्याचार कमी होतील असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच सौ मंगल कनप केंद्र प्रमुख यांनी हि मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलिप पाटील यांनी केले तर उपस्थिताचे अभार. रत्नदिप पाटील भैय्या यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!