ताज्या घडामोडी

किसान नागरी सह पतसंस्थेने कर्जपुरवठ्यासह समाजहित जोपासण्याचे आदर्श कार्य केले आहे – श्री . शिवाजीराव नाईक

Spread the love

किसान नागरी सह . पतसंस्थेने कर्जपुरवठ्यासह समाजहित जोपासण्याचे आदर्श कार्य केले आहे . छोट्या उद्योगांना शक्ती देणे त्यांच्या कार्याला उभारणी देणे , पत संस्थेच्या माध्यमातून ग्रामिण भागातील लहान शेतकरी हि खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या संपन्न होताना दिसत आहे . शहरातील अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी या पतसंस्थेच्या माध्यामातून मिळत असतात असे मत महाराष्ट्राचे माजी सार्वजनिक बांधकांम राज्यमंत्री मा . श्री . शिवाजीराव नाईकसाहेब यांनी व्यक्त केले.

इस्लामपूर , किसाननगर येथील किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवीसाव्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते . समारंभाच्या अध्यक्षस्थानी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष , सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे होते . प्रारंभी सरस्वती पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले .

अध्यक्षिय भाषणात बोलताना सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे बोलताना म्हणाले कि , अशोकराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पतसंस्थेच्या समाज कार्याचा आदर्श इतर संस्थानी घ्यावा . विद्यार्थ्याना प्रेरणा मिळावी म्हणून दरवर्षी सभासदांच्या गुणी विद्यार्थ्याचा सन्मान करणारी एकमेव संस्था आहे . विद्यार्थ्यानी शैक्षणीक दृष्ट्या जे क्षेत्र निवडले आहे . त्यात जिव लावून काम करा , प्रयत्नांची पराकष्ठा करा यश हे आपणास निश्चित मिळाल्याशिवाय रहात नाही . आपण किती प्रयत्न करतो यावर आपले भविष्यातील यश अवलंबून असते .

यावेळी सोशल मिडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत शिवचिंतन पोहोचवल्याच्या कार्याची दखल घेवून शासनाच्यावतीने शंभूशाहिर प्रा . अरूण घोडके यांच्या फोटोसह नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केल्याबद्दल मा . प्रा . अरूण घोडके यांचा माजी मंत्री शिवाजीराव नाईक व मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या हस्ते शाल , फेटा , बुके व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला . यावेळी शंभूशाहिर प्रा . अरूण घोडके यांनी मनोगत व्यक्त केले .

प्रमुख पाहूणे मा . श्री . शिवाजीराव नाईक , मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांचा संस्थेच्यावतीने संस्थापक अशोकराव देसाई , चेअरमन श्री . सचिन देसाई , व्हा . चेअरमन भारत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . स्वागत व प्रास्तावीक श्री . बजरंग कदम यांनी केले . संस्थेच्या सभासदांच्या गुणी मुलांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिल्ड , प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून करण्यात आला . तसेच महिलासाठी हळदी कुंकु समारंभ घेण्यात आला यावेळी किसान उद्योग समुहाचे संस्थापक श्री . अशोकराव देसाई , राजाभाऊ कदम , मानसिंगराव मदने , विश्वासराव शेवाळे , मनिष जाधव , जालिंदर कोळी , सौ . वंदना खोत , भाग्यश्री पाटील यांच्या सह अनेक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बजरंग कदम यांनी केले . संयोजन संस्थेचे मॅनेजर रोहित खवळे , मनिष जाधव , धनाजी लोहार , अशोकराव मोरे , विशाल काळगुंडे , बाळासो कोकाटे , तुकाराम नाळकर यांनी केले , शेवटी आभार जयंत देसाई यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!