ताज्या घडामोडी

माधवराव पाटील महाविद्यालयात व्याख्यानाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी 

Spread the love

मुरूम, ता. ०६ (प्रतिनिधी) :  येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शुक्रवारी (ता.६) रोजी व्याख्याने उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र पत्रकार संघ, जिल्हा उस्मानाबाद व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व प्रतिपादन करताना पत्रकार हा देशाचा कणा आहे. त्यांच्या लेखणीतून समाज प्रबोधन करून देशहित,
राष्ट्रप्रेम जपले पाहिजे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांची लेखणी करते. असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव डॉ. सुधीर पंचगल्ले, माजी तालुकाध्यक्ष बालाजी व्हनाजे, कार्यालयीन अधिक्षक राजू ढगे, डॉ. शिला स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पत्रकार प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य विषयाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्ल प्राचार्य अशोक सपाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. नरसिंग कदम, डॉ. सुजित मटकरी, डॉ. विलास खडके, डॉ. सुशिल मठपती, प्रा. सुधीर नाकाडे, प्रा. संजय गिरी, प्रा. सुजाता मुके, डॉ. राजकुमार देवशेट्टे, डॉ. प्रतापसिंग राजपूत, डॉ. राजू शेख, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. अविनाश मुळे, मुनीर शेख, नाना बेंडकाळे, राजानंद स्वामी, लालअहमद जेवळेसह पत्रकार अजिंक्य कांबळे, भीमाशंकर पांचाळ, योगेश पांचाळ, नामदेव भोसले, सुभाष गायकवाड, राजेंद्र गायकवाड, वैभव शिंदे, अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. किरण राजपूत यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्य अशोक सपाटे, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, सर्व पत्रकार बांधव, कर्मचारी वृंदासह उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!