ताज्या घडामोडी

अनुदान पुर्ववत सुरू करून ऊस तोडणी यंत्राची संख्या वाढविण्याची मागणी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव

Spread the love

इस्लामपूरः प्रतिनिधी
यावर्षी ऊस तोडणी मजूरांची कमतरता निर्माण झाल्याने ऊस गाळपावर परिणाम होत असून आडसाली हंगामातील १८ ते २० महिने झाले तरीही ऊस तुटला जात नाही. याचा गैरफायदा घेऊन ऊस तोडणी मजूर , मुकादम व चिटबॅाय यांचेकडून शेतक-यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याने अनुदान पुर्ववत सुरू करून ऊस तोडणी यंत्राची संख्या वाढविण्याची मागणी केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी केली.
जाधव म्हणाले कि जिल्हात सरासरी सव्वा दोन लाख हेक्टर उसाचे पिक आहे सध्या उस तोडणी हंगाम सुरू आहे. वाढत्या महागाई ऊस शेती करणे परवडत नाहीत.मिश्रखते औषधे डिझेल, मजुरयामध्ये शेतकरीपिचलेला असताना ऊस तोडणी व वाहतूकीचे शेतकऱ्यांचे पैसे ऊस बिलातून कपात केले जातात,तरीही बैलगाडी वाहतूक करणाऱ्या एक बैलगाडी तीनशे ते चारशेची पर बैलगाडी मागणी करतात.तर बैलगाडी बाहेर काढण्यासाठी ट्रक्टर वाहुकदारानी तीनशे रूपये बाहेर काढण्यासाठी खर्च शेतकऱ्यांच्या बसतो, कारखानदार ते पैसे तोडणी मजुरांना व वाहतुकदाराना देतात पण तरीही ऊसतोड मंजूर मुकादम मजुर व कारखाना कर्मचारी शेतकऱ्यांची अडवणुक करतात. त्याचबरोबर ट्रक्टर व ट्रक वाहतूक करणारे वाहनदारक
एकरी पाच ते सात हजार तोडणीसाठी पैसे घेतात.सोबत दारु,मासाहारीजेवणावळीची हि राजरोसपणे मागणी करतात हि एक प्रकारची खंडणीच आहे त्यामुळे ऊस तोडणीसाठी पैसे मागणार्या मुकादम, मजुर, स्लीप बाँय , आणि साखर कारखान्याच्या शेती अधिकार्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात यावे.

ऊस उत्पादक शेतकरीनी एकजूट करून तोडणीसाठी पैसे देणे बंद करावे. त्याचे पैसे ऊसतोडणी साठी गेले आहेत त्यानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तेच्या कडे तक्रार करावी, आम्ही ते पैसे साखर आयुक्त करुन वसुल करुन देऊ असेही भागवत जाधव यांनी आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!