ताज्या घडामोडी

सन्मान भगिनींचा सन्मान आपुलकीचा

Spread the love

प्रतिनिधी ~सौ.मंजुषा पवार

दि 8 मार्च 2023 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघ परिवार थोरात गटाचे वतीने तालुक्यात कार्यरत सर्व महिला शिक्षिका यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संघटनेच्या वतीने सर्व भगिनींना एक आपुलकीची भेट म्हणून उत्कृष्ट दर्जाची पिण्याच्या पाण्याची बाटली भेट देण्यात आली. दरवर्षी आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटाचे वतीने महिला दिनी पुस्तक वाटप होत असते परंतु या वर्षी उन्हाचा तडाखा आणि थोडासा बदल म्हणून पिण्याच्या पाण्याची बाटली देण्यात आली. या अभिनव उपक्रमाचे भगिनींनी कौतुक तर केलेच पण अशा आणखी वेगळ्या कल्पना सुचवल्या. आपली माणसं समोर असतात त्यावेळी हक्काने माणसं सुचवत असतात. खरोखरच महिला भगिनींच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारी संघटना म्हणून आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटाकडे पाहिले जाते.*
*यासाठी सर्व शिलेदारांनी विशेष मेहनत घेतली. सांगली जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक शरद चव्हाण पाटील,जिल्हा सहसचिव हणमंतराव गायकवाड, तालुकाध्यक्ष असिफ मुजावर, नेते जीवन सावंत,नेते विश्वासराव पुजारी, जिल्हा उपाध्यक्ष रसिक सपाटे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील गायकवाड, सरचिटणीस श्रीकांत मोरे, तालुका उपाध्यक्ष संजय काळेल, सुरेश मोटे, प्रशांत कडव, राजेंद्र बदडे, जयंत देठे, जिल्हा प्रवक्ते नारायण कदम, प्रसिद्धी प्रमुख अजिनाथ बुधावले, कविवर्य रवि दादा भोसले, महेश गोंजारी, विकास पालसांडे, जयंत पांढरे बापु, किरण राऊत, तानाजी ढोले व दिघंची टिम, नेते भरत कदम, रमेश सुर्यवंशी, संतोष क्षीरसागर, दत्ता चोथे, विष्णू कांबळे, जुबेर जमादार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर खिलारी, अमोल मिसाळ, राहुल गायकवाड, नेते अनिल थोरात, सचिन गायकवाड, शंकर चव्हाण,प्रवीण कुलकर्णी, नेते नितीन वाघमारे, शहाजी वाक्षे, प्रमोद सुर्यवंशी,प्रमोद कानगुडे,रावसाहेब देवडकर, संदीप केदार सर, सुखदेव काळेल, नवनाथ आव्हाड, सागर सुपेकर, सागर नागणे, शाम वनारसे, तालुका महिला आघाडी इ शिलेदारांनी विशेष मेहनत घेतली.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!