महाराष्ट्र

सातेगावातील प्रगतीशील शेतकरीरामचंद्र दशरथ आगळमे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल आणि श्रीमती गोदाबाई दशरथ आगळमे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा ता.५ रोजी संपन्न..

श्री.विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या आवारामध्ये उत्साहात संपन्न

Spread the love

सातेगावातील प्रगतीशील शेतकरी.रामचंद्र दशरथ आगळमे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल आणि श्रीमती गोदाबाई दशरथ आगळमे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा ता.५ रोजी संपन्न.. Progressive farmers of Sategaon. Ramachandra Dashrath Agalme for completing Narmada Parikrama and Mrs. Godabai Dashrath Agalme Sahasrachandra Darshan ceremony concluded on 5th.

आवाज न्यूज : लोणावळा ता.८(प्रतिनिधी )

प्रगतीशील शेतकरी श्री.रामचंद्र दशरथ आगळमे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल आणि श्रीमती गोदाबाई दशरथ आगळमे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा सातेगावातील श्री.विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या आवारामध्ये उत्साहात संपन्न झाला.

रामचंद्र दशरथ आगळमे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल आणि श्रीमती गोदाबाई दशरथ आगळमे यांचे सहस्रचंद्र दर्शन सोहळा निम्मित्त पूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये काकड आरती, गंगापूजन, विठ्ठल जप,हरिपाठ,प्रवचन ह.भ.प.घनशाम महाराज पडवळ,आणि ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे यांचे किर्तन झाले.

 

ह.भ.प.वांजळे महाराज यांनी कीर्तनात नर्मदा परिक्रमाचे महात्म व आई वडीलांची सेवा केल्याने काय फळ प्राप्त होते , यावर कीर्तनात चिंतन केले. यावेळी तसेच कृषी,आरोग्य,संरक्षण ,धार्मिक ,क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांचा सत्कार केला. यामधे मावळचे लोकप्रिय आमदार यांच्या मातोश्री.सुमन शंकरराव शेळके, शिवाजीराव टाकवे,डाॕ.नेमिचंद बाफना,बाळासाहेब काजळे, मारुती गाडे ,दत्तात्रय शेलार इ.यांना सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन .दशरथ आगळमे ,उमेश आगळमे आणि मुकूंद आगळमे यांनी केले .कार्यक्रमाचे नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी साते आणि आगळमे परीवारातील सर्व पाहूण्यांनी केले..साते येथे श्री.विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या आवारामध्ये रविवार दि.५/०३/२०२३ रोजी .रामचंद्र दशरथ आगळमे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल आणि श्रीमती गोदाबाई दशरथ आगळमे यांचे सहस्रचंद्र दर्शन सोहळा त्यांचा यथोचित सत्कार करून पार पडला.

 

कार्यक्रमावेळी काकड आरती,गंगापूजन,विठ्ठल जप,हरिपाठ,प्रवचन ह.भ.प.घनशाम महाराज पडवळ,आणि ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे यांचे किर्तन झाले. तसेच कृषी,आरोग्य,संरक्षण ,धार्मिक ,क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मावळचे लोकप्रिय आमदार यांच्या मातोश्री सुमन शंकरराव शेळके, शिवाजीराव टाकवे,डाॕ.नेमिचंद बाफना ह.भ.प.बाळासाहेब काजळे, मारुती गाडे दत्तात्रय शेलार यांना शाल , श्रीफळ , स्मृतीचिन्हे देवून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना महाप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन दशरथ आगळमे उमेश आगळमे आणि मुकूंद आगळमे यांनी केले .
या कार्यक्रमाचे नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी साते आणि आगळमे परिवारातील सर्व पाहुण्यांनी केले.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!